Bhaishree Rameshbhai Ojha: सध्याच्या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये सनातन विचार समाविष्ट करणे ही काळाची गरज आहे. आपली ओळख आपल्या परंपरेतूनच होते. प्रतिपादन भागवत कथा वाचक भाई श्री रमेश भाई ओझा यांनी केले.
हिंगोली (Bhaishree Rameshbhai Ojha) : सध्याच्या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये सनातन विचार समाविष्ट करणे ही काळाची गरज आहे कारण आपली ओळख आपल्या परंपरेतूनच होते असे प्रतिपादन भागवत कथा वाचक भाई श्री रमेश भाई ओझा (Bhaishree Rameshbhai Ojha) यांनी केले. हिंगोलीत आयोजित श्रीमद भागवत कथेच्या पहिल्या दिवशी ते बोलत होते.
हिंगोलीत गजराज बाल गणेश मंडळातर्फे आयोजित श्रीमद् भागवत कथेला पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठी गर्दी केली. तळपत्या उन्हात काढण्यात आलेल्या कलशयात्रेत महिला व पुरुष भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. भागवत महात्म्य आणि भारतीय परंपरेबाबत बोलताना भाईश्री म्हणाले की शेकडो वर्षे भारतावर सत्ता गाजवून मुघलांना जे जमले नाही ते इंग्रजांनी केवळ दोनशे वर्षांत केले. भारतात असलेली सनातन शिक्षण पद्धती बदलून इंग्रजी जीवनशैली शिकविणारी शिक्षण पद्धती इंग्रजांनी सुरू केली. यामागे त्यांची कुटील नीती होती भारतीयांना आपल्या कामापुरते शिक्षण देऊन त्यांना गुलाम बनवून ठेवण्याची व्यवस्था या शिक्षण पद्धतीमुळे रूढ झाली. प्रत्येकाला आपली जात,धर्म,देश व परंपरेचा अभिमान असायलाच पाहिजे, असे आग्रही अनुमोदन रमेश भाई ओझा (Bhaishree Rameshbhai Ojha) यांनी केले. ईश्वराच्या अस्तित्वावर शंका उपस्थित करणाऱ्यांनी ब्रम्हांडाचे अस्तित्व आहे म्हणजेच ईश्वराचे अस्तित्व आहे हे समजून घेतले पाहिजे, असेही भाई श्री म्हणाले.

भागवत कथेच्या पहिल्या दिवशी हिंगोली शहरासहित ग्रामीण भागातून भाविकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. विविध धार्मिक व सेवाभावी संस्थांनी कथा मंडपाच्या परिसरात भाविकांसाठी अनेक सेवा उपलब्ध करून दिल्या. ही भागवत कथा 25 मार्चपर्यंत चालणार असून दर दिवशी सायंकाळी साडेचार ते साडेसात दरम्यान रमेश भाई ओझा हे भागवत कथा सांगणार आहेत. या भागवत कथेला मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती राहत आहे.
कथा मंडपात महाभारतातील विविध प्रसंगातील प्रतिमा...
येथील श्रीमद भागवत कथा स्थळी मंडपात महाभारतातील विविध प्रसंगतील पोस्टर लावण्यात आले.
मंडपात थंड हवेचे फवारे..
आता उन्हाळा सुरु आहे, त्यातच श्रीमद भागवत कथा ऐकन्यासाठी भविकांनी गर्दी केली. भाविकांना उन्हाचा फटका बसू नये यासाठी समितीने पूर्ण कथा मंडपात थंड हवेचा फवारा सुरु असल्याने आवघे मंडप एसी वाटत होते.
स्क्रीनची व्यवस्था..
कथा मंडपात कथा ऐकन्या साठी आलेल्या भाविकांना दुरवर बसलेल्याना स्क्रीन बसविल्या मुळे जवळून दिसत होते. पहिल्या दिवशी भाविकानी कथेचा मनमुराद पणे आनंद लुटला.
मेघराजाचे आगमन..
येथील कथा मंडपात श्रीमद भागवत कथा सुरु झाल्यानंतर जवळपास एका तासाने आकाशात विजेचा कडकडाट आणि जोरदार पाऊस झाल्याने वरून राजाने ही हजेरी लावली की काय असा प्रश्न उपस्थित झाला.