Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > अध्यात्म

राम कथेचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा: राधेश्याम चांडक

योध्या येथील साध्वी सृष्टीलता रामयणीजी आपल्या अमृतमय वाणीतुन श्रीराम कथा प्रस्तुत करणार आहे.


राम कथेचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा राधेश्याम चांडक

Radheshyam Chandak |

बुलडाणा (Radheshyam Chandak) : सद्भावना सेवा समिती द्वारा दिनांक ७ एप्रिल ते १५ एप्रिल पर्यंत भव्य संगीतमय राम कथेचे आयोजन करण्यात येत आहे. अयोध्या येथील साध्वी सृष्टीलता रामयणीजी आपल्या अमृतमय वाणीतुन श्रीराम कथा प्रस्तुत करणार आहे. या संदर्भात नुकतीच कथेच्या नियोजनासाठी महिलांची सभा संपन्न झाली. या सभेत महिलांमध्ये प्रचंड उत्साह दिसुन आला व अनेक सुचना प्राप्त झाल्या. कथेचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा असे आवाहन राधेश्याम चांडक (Radheshyam Chandak) यांनी केले.विद्यार्थी रामकथे मध्ये यावे, यासाठी महिलांनी विविध सुचना केल्या.

विद्यार्थी व पालक सर्वांना संस्काराची गरज आहे व आजची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रशोत्तरी, बक्षीस वितरण असे उपाय करण्यात येईल. पालकांनी आपल्या पाल्यांना कथा मंडपात पाठवावे असे आवाहन भाईजींनी केले. उन्हाळा असल्याने डोमचा भव्य मंडप व कुलरची व्यवस्था लहाने ले-आऊटच्या ग्राऊंडवर करण्यात आली आहे. ७ एप्रिलला सकाळी ९ वाजता गणेश मंदीर सुवर्णनगर पासुन शोभा यात्रा प्रारंभ होवुन शहरातील संगम चौक, जयस्तंभ चौक, महावीर चौक, मेनरोड, बुलडाणा अर्बन, दुर्गा माता मंदीर, भारतमाता चौक व पेठेतील राम मंदीरा पर्यंत जाईल. विविध देखावे, दिंड्या शोभा यात्रेत राहील. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सभेत मार्गदर्शन केले.

सभेमध्ये किरण वर्मा, मिनाक्षी वर्मा, गिता शर्मा, मंजु शर्मा, अश्विनी वाईकर, मनिषा शर्मा, माया शर्मा, आरती शर्मा, कु. शुभांगी चंदन, रुपा शर्मा, अंजली परांजपे, हंसा शर्मा, मनिषा बाहेती, सपना अग्रवाल, प्रिती अग्रवाल, जमना शर्मा यांची उपस्थिती होती. सदभावना सेवा समितीचे कार्याध्यक्ष चंपालाल शर्मा, सचिव प्रा. प्रकाशचंद्र पाठक, कोषाध्यक्ष तिलोकचंद चांडक, सुरेशचंद्र गट्टाणी आदींची उपस्थिती होती. आभार प्रदर्शन व सुत्रसंचालन लाला माधवाणी यांनी केले.