पॅकेजिंग नियम चिन्ह बंधनकारक

ग्राहकांसाठी मोठा बदल! साबण, शाम्पू, टूथपेस्टवर शाकाहारी-मांसाहारी चिन्ह बंधनकारक

Packaging Symbols Mandatory: नव्या नियमांनुसार साबण, शाम्पू, टूथपेस्ट, सौंदर्यप्रसाधने आणि अन्य टॉयलेटरीजच्या पॅकेजवर उत्पादनाची शाकाहारी किंवा मांसाहारी उत्पत्ती दर्शविणारे चिन्ह लावणे बंधनकारक

ग्राहकांसाठी मोठा बदल! साबण, शाम्पू, टूथपेस्टवर शाकाहारी-मांसाहारी चिन्ह बंधनकारक

Packaging Symbols Mandatory

 

सौंदर्यप्रसाधने, साबण आणि टॉयलेटरीजच्या पॅकेजिंगमध्ये केंद्र सरकारचा बदल

नवी दिल्ली (Packaging Symbols Mandatory) : सौंदर्यप्रसाधने तसेच दैनंदिन वापरातील वस्तूंमध्ये वापरण्यात आलेल्या घटकांची उत्पत्ती ग्राहकांना सहज समजावी, यासाठी केंद्र सरकारने पॅकेजिंग नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. नव्या नियमांनुसार साबण, शाम्पू, टूथपेस्ट, सौंदर्यप्रसाधने आणि अन्य टॉयलेटरीजच्या पॅकेजवर उत्पादनाची शाकाहारी किंवा मांसाहारी उत्पत्ती दर्शविणारे चिन्ह लावणे बंधनकारक (Packaging Symbols Mandatory) करण्यात आले आहे.

नियमांनुसार, शाकाहारी उत्पत्तीच्या उत्पादनांवर हिरवा ठिपका, तर मांसाहारी उत्पत्तीच्या उत्पादनांवर लाल किंवा तपकिरी ठिपका लावावा लागणार आहे. हे चिन्ह पॅकेजच्या मुख्य दर्शनी भागाच्या वरच्या बाजूस स्पष्टपणे दिसेल अशा पद्धतीने लावणे आवश्यक आहे.

21 सप्टेंबरपासून नियम लागू

‘लीगल मेट्रोलॉजी (पॅकेज्ड कमोडिटीज) चौथी सुधारणा नियम, 2026’ अंतर्गत हा बदल करण्यात आला आहे. 21 सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी झाल्यानंतर ही तरतूद लागू झाली आहे. त्यामुळे उत्पादक, पॅकर आणि आयातदारांना नव्या नियमांनुसार उत्पादनांचे पॅकेजिंग करावे लागणार आहे. यापूर्वीही (Packaging Symbols Mandatory) उत्पादनांच्या शाकाहारी-मांसाहारी स्वरूपाची माहिती देण्यासाठी अशा चिन्हांची तरतूद होती. मात्र, 2026च्या सुधारणेत ही तरतूद नव्या स्वरूपात समाविष्ट करण्यात आली असून, संबंधित जुनी उपतरतूद वगळण्यात आली आहे.

सौंदर्यप्रसाधने, साबण, शाम्पू, टूथपेस्ट किंवा इतर टॉयलेटरीजमध्ये प्राणिजन्य घटकांचा वापर झाल्यास त्यानुसार मांसाहारी उत्पत्तीचे चिन्ह लावावे लागणार आहे. या (Packaging Symbols Mandatory) बदलामुळे ग्राहकांना उत्पादनाची उत्पत्ती समजणे अधिक सोपे होणार असून, त्यांच्या माहितीच्या अधिकाराच्या दृष्टीनेही या निर्णयाकडे पाहिले जात आहे.