Namdev Maharaj Palkhहिंगोली तालुक्यातील संत नामदेव महराजांच्या प्रथम अश्वरिंगण सोहळ्याचे आयोजन. सहानुभुतीकर्त्यांनी गेल्या वर्षी पंढरपूरला जाणाऱ्या पालखीच्या दिंडीचा मुक्काम हिंगोलीत
हिंगोली नगरपरिषद तर्फे रिंगण सोहळ्याची जय्यत तयारी
सोहळ्यात नागरिकांनी उपस्थित राहण्याचे नगराध्यक्षा रेखाताई श्रीराम बांगर यांचे आवाहन
हिंगोली (Namdev Maharaj Palkhi) : तालुक्यातील नर्सी नामदेव येथील श्री संत नामदेव महाराज पालखी सोहळ्याचे ५ जुलै रविवारी रोजी प्रस्थान झाले आहे. ६ जुलै रोजी हिंगोलीत पालखीचे आगमन होणार असून सायंकाळी चार वाजता रामलीला मैदानावर पहिले अश्व रिंगण होणार आहे. मुक्कामानंतर पालखी पुढील प्रवासासाठी रवाना होणार आहे. या रिंगण सोहळ्याला हिंगोली शहरातील नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्षा रेखाताई श्रीराम बांगर यांनी केले आहे.
१९ ठिकाणी राहणार पालखी सोहळयाचा मुक्काम.व हिंगोलीसह इतर टाच ठिकाणी अश्व रिंगण सोहळा रंगणार आहे. श्री क्षेत्र असलेल्या नर्सी नामदेव येथून दरवर्षी प्रमाणे यंदाही पंढरपूर येथे आषाढी एकादशी वारीसाठी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पायदळ पालखी दिंडी सोहळ्याचे दिंडी चालक हभप बळीरामजी महाराज सोळंके याच्या मार्गदर्शनाखाली ५ जुलै रोजी नर्सी नामदेव येथून ४०० वारकर्यांसह दिंडी निघाली आहे.पहिला मुक्काम हा नर्सी येथेच झाला आहे.
सोमवारी पालखी हिंगोली शहरात दाखल होणार असून नांदेड नाका भागात पालखीचे स्वागत होईल त्यानंतर पालखी इंदिरा गांधी चौकातुन जुनी नगर परिषद इमारती जवळुन रामलीला मैदानावर जाणार आहे. येथे ४ वाजता पालखीचे पहिले गोल रिंगण होणार आहे. या रिंगणमध्ये मोठ्या संख्येने अश्व सहभागी होणार आहेत. यानंतर कल्याण मंडपात पालखीचा मुक्काम असणार आहे. येथे कागलीवाल परिवाराच्या वतीने वारकर्यांच्या भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे. ७ जुलै मंगळवार रोजी पालखी औंढा नागनाथ येथे मुक्कामी थांबणार आहे. त्यानंतर बाराशीव, हट्टा, परभणी, पोखर्णी, गंगाखेड, उकडगाव, परळी वैजनाथ, अंबाजोगाई, बोरी सावरगाव, वडगाव रामा, मसा, दगड धानोरा, खांडवी, चिंचगाव टेकडी, लहुळ, आष्टीमार्गे, पंढरपूरकडे रवाना होणार आहे.
संत नामदेवांच्या पालखी दिंडी (Namdev Maharaj Palkhi) सोहळ्यासोबत किर्तनकार, भजनी मंडळी, विणेकरी, चोपदार, पुजारी, रथचालक, मृदूंगाचार्य,वाहन व्यवस्थापक, भांडारकुटी व्यवस्थापक, अश्व सेवेदार, अश्व व भाविकांचा पालखी दिंडी सोहळ्यामध्ये सहभाग झाले आहेत. दरम्यान आजच्या रिंगण सोहळ्या निमित्त नगर परिषद प्रशासनाच्या वतीने मैदानाची स्वच्छता व इतर आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यासाठी युध्द पातळीवर काम सुरू आहे. रिंगण सोहळा यशस्वी करण्याकरीता अधिकारी, कर्मचारी परीश्रम घेत असुन भाविक भक्त पालखीच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.
तत्कलिन नगराध्यक्षा अनिता सुर्यतळ यांच्या कार्यकाळात सुरू झाले रिंगण
हिंगोली न.प.च्या तत्कालिन नगराध्यक्षा अनिता सदाशिव सुर्यतळ यांच्या कार्यकाळात जून २०१४ मध्ये संत नामदेव महाराजांच्या रिंगणची सुरूवात नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू करण्यात आली.