पुसेगाव सर्वज्ञ तीर्थक्षेत्र

पुसेगाव सर्वज्ञ तीर्थक्षेत्रात १ ऑगस्टला विरागसागर महाराजांच्या २४ व्या वर्षायोगानिमित्त मंगल कलश स्थापना

Pusegaon Sarvajna Pilgrimage:

पुसेगाव सर्वज्ञ तीर्थक्षेत्रात १ ऑगस्टला विरागसागर महाराजांच्या २४ व्या वर्षायोगानिमित्त मंगल कलश स्थापना

Pusegaon Sarvajna Pilgrimage

हिंगोली (Pusegaon Sarvajna Pilgrimage) : सेनगाव तालुक्यातील सर्वज्ञ तीर्थक्षेत्र पुसेगाव येथील श्री संभवनाथ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात भारत गौरव राष्ट्रसंत गणाचार्य श्री १०८ विरागसागर महाराज यांच्या २४ व्या वर्षायोगा निमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा (Pusegaon Sarvajna Pilgrimage) मंगलमय कार्यक्रम १ ऑगस्ट शनिवार रोजी दुपारी १ वाजता होणार आहे. यानिमित्ताने मंदिर परिसरात विशेष पूजा, अभिषेक आणि कलश स्थापना करण्यात येणार आहे. श्रमणी आर्यिका श्री १०५ विशाखाश्री माताजी यांच्या सानिध्यात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
  
वर्षायोगाच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांसाठी भोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. नांदेड येथील डॉ. दीपक गोरे यांच्या वतीने उपस्थित भाविकांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात येणार आहे.मुंबई येथील स्नेहा प्रकाशचंद जैन यांच्या वतीने वात्सल्य भोजचे आयोजन करण्यात आले आहे. या पवित्र कार्यक्रमाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त दिगंबर जैन समाज पुसेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मंदिर समिती आणि समाज बांधवांनी जय्यत तयारी केली आहे. परिसरात स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची आणि बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

गणाचार्य श्री विरागसागर महाराजांच्या वर्षायोगामुळे पुसेगाव तीर्थक्षेत्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यभरातील जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.