Aundha Nagnath Temple: औंधा नागनाथाचे मंदिर जुलै-जूनमध्ये दर्शनेसाठी हजारो भक्तांनी मोठ्या संख्येला मंडळी घेतले. ३५ लाख रु.च्या उत्कृष्टदानासह, भक्तांनी अभिषेक व रोकड देणगी देऊन मंदिराला दान दिले.
औंढा नागनाथ (Aundha Nagnath Temple) : अधिक मासाच्या पवित्र पर्वणीत आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथाच्या चरणी भाविकांनी अपार श्रद्धा वाहिली. १६ मे ते १५ जून या अधिक महिन्यात देशभरातून आलेल्या हजारो भाविकांनी सढळ हाताने दान करत मंदिर संस्थानला तब्बल ३५ लाख २३ हजार ९७५ रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले.
मंदिर व्यवस्थापक सुरेंद्र डफळ यांनी १९ जून रोजी ‘देशोन्नती’शी बोलताना ही माहिती दिली. (Aundha Nagnath Temple) अधिक मासात देवी-देवतांचे दर्शन फलदायी मानले जाते. भारतातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथाच्या दर्शनासाठी या काळात देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या कालावधीत भाविकांनी अभिषेकासाठी १७ हजार २४० रुपये, रोख देणगी स्वरूपात १८ लाख १८ हजार ३०० रुपये, चांदीच्या वस्तूंच्या रूपाने ९ लाख ८९ हजार ६२० रुपये, तर अन्नदानातून २९ हजार १६४ रुपये अर्पण केले. इतर विविध देणग्यांसह एकूण ३५ लाख २३ हजार ९७५ रुपयांचे दान संस्थानला प्राप्त झाले.
महिनाभर चाललेल्या या (Aundha Nagnath Temple) गर्दीचे नियोजन तहसीलदार तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष हरीश गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. भाविकांसाठी रांगेत पाणी, फराळ, चहा आदी सुविधांची व्यवस्था अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ यांच्यासह मंदिर कर्मचाऱ्यांनी केली. सुरक्षा प्रमुख बबन सोनूणे, प्रदीप जोशी, कृष्णा पाटील, नागेश माने यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली.
मुख्य पुजारी तुळजादास भोपी, बंडू भोपी, रामेश्वर गुरव यांनी नित्य पूजेनंतर पहाटे पाच वाजता मंदिर दर्शनासाठी खुले केले. दररोज ४५ हजारांहून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतल्याने रात्री उशिरापर्यंत मंदिर भाविकांनी फुललेले होते.