Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आणखी > अध्यात्म

नुरी बाबा उरूस मिरवणूक

नुरी बाबा उरूस निमित्त भव्य मिरवणूक; हजारो संख्या भाविकांची उपस्थिती

Nuri Baba Urs Procession: कळमनूरच्या दरगाहात मोहम्मद नुरी शहिद बाबाच्या सन्दल मिरवणुकासाठी हजारो भक्तांना आला. नंतर आपुलकीसाठी पोलिस जागोजागी बंदोबस्त करत असल्याचे दिसून आले.


नुरी बाबा उरूस निमित्त भव्य मिरवणूक हजारो संख्या भाविकांची उपस्थिती 

Nuri Baba Urs Procession |

कळमनुरी (Nuri Baba Urs Procession) : येथील प्रसिद्ध हजरत  नुरी बाबा उर्स निमित्त संदल कार्यक्रम भव्य मिरवणूक द्वारे हजारो नुरी भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. येथील राज्य भरात प्रसिद्ध नुरोद्दीन नुरी शहीद बाबा यांचा आज इस्लामी महिना मोहर्रम 21 तारखेनुसार  संदल कार्यक्रम दुपारी रजा मैदान वरून प्रारंभ झाला उंटावर संदल चढवण्यात आला. जवळपास 20 विविध शहरातील नामवंत ढोल ताशाच्या गजरात व सुमधुर स्वरात नात पठण करीत मिरवणूक रात्री उशिरा दर्गाह  वर पोहचली. 

संदल मजार शरीफ वर चढवण्यात आला दर्गाह खादीम सय्यद खुदरतुल्लाह हुसेनी यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक प्रार्थना करण्यात आली व महाप्रसादचे वाटप करण्यात आले. यावेळी हजारो नुरी भक्तांच्या उपस्थिती ने दर्गाह परिसर फुलून गेला होता. (Nuri Baba Urs Procession) दर्गाह परिसरात बाहेर गावाहून आलेले नुरी भक्तांसाठी आशिकाने नुरी कमेटी च्या वतीने लंगर मोफत जेवण व्यवस्था करण्यात आली होती सदर लंगर चे नियोजन अविरत सलग तीन दिवस असतो.

मिरवणूक दरम्यान जागोजागी लंगरचे आयोजन
राज्यसहा इतर राज्याचे (Nuri Baba Urs Procession) नुरी बाबा संदल मिरवणुकीसाठी आलेले भाविकांचे गैरसोय होऊ नये यासाठी शहरातील युवकांनी जागोजागी लंगर आयोजन आले होते. या लंगर चा हजारो भाविकांनी लाभ घेतला.
 
पोलीस प्रशासनाचा चौख बंदोबस्त
कळमनुरी शहरातील (Nuri Baba Urs Procession) नुरी बाबा उरूस निमित्त हजारो संख्याने भाविकांची उपस्थिती होती. या मिरवणुकीमध्ये कोणतेही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी पोलीस निरीक्षक जमीर नाईक यांचे नेतृत्वात शहरातील जागोजागी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अतिरिक पोलीस बल ही बोलवण्यात आले होते.