Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आणखी > अध्यात्म

संत मुक्ताबाई पालखी

350 वर्षांची परंपरा जपणाऱ्या संत मुक्ताबाई पालखीचे चिखलीत उत्स्फूर्त स्वागत

Saint Muktabai Palkhi: साडेतीनशे वर्षांची अखंड परंपरा लाभलेली संत मुक्ताबाईंची पालखी मुक्ताईनगर येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करून मंगळवारी (दि. ३०) चिखली शहरात दाखल झाली.


350 वर्षांची परंपरा जपणाऱ्या संत मुक्ताबाई पालखीचे चिखलीत उत्स्फूर्त स्वागत

Saint Muktabai Palkhi |

चिखली (Saint Muktabai Palkhi) : साडेतीनशे वर्षांची अखंड परंपरा लाभलेली संत मुक्ताबाईंची पालखी मुक्ताईनगर येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करून मंगळवारी (दि. ३०) चिखली शहरात दाखल झाली. पालखीच्या आगमनानिमित्त चिखली शहरासह परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

चिखली शहराच्या सीमेवर श्री रेणुका देवी संस्थानच्या वतीने पालखीचे तसेच पालखीसोबत पायी चालणाऱ्या वारकरी, भाविक व सेवेकऱ्यांचे पुष्पवृष्टी करून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांसाठी अन्नदान, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच विविध भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. मार्गावरील विविध ठिकाणीही सामाजिक संस्था, मंडळे व नागरिकांकडून वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.

या (Saint Muktabai Palkhi) पालखीच्या सेवेत चिखली तालुक्यातील आंतरवाडी येथील शेतकरी मित्र सचिन बोंद्रे आणि स्वप्निल उर्फ आपूशेठ गुप्ता हे गेल्या पाच वर्षांपासून आपल्या बैलजोडीची सेवा देत आहेत. बुलढाणा घाटातील चढणीपासून ते देऊळगाव राजा परिसरापर्यंत पालखी रथ ओढण्यासाठी ते आपल्या बैलांची निःस्वार्थ सेवा अर्पण करतात. त्यांच्या या सेवाभावाचे वारकरी संप्रदायातून कौतुक होत आहे.

सुमारे साडेपाचशे किलोमीटरचा प्रवास करणारी आणि साडेतीनशे वर्षांची परंपरा लाभलेली संत मुक्ताबाईंची ही पालखी महाराष्ट्रातील सर्वात मानाच्या आणि ऐतिहासिक पालख्यांपैकी एक मानली जाते. मार्गातील प्रत्येक गावात भाविक मोठ्या श्रद्धेने पालखीचे दर्शन घेतात आणि "जय मुक्ताई"च्या गजरात पालखीचे स्वागत करतात. (Saint Muktabai Palkhi) संत मुक्ताबाईंच्या पालखीच्या चिखली आगमनामुळे शहरात वारकरी संप्रदायाचा भक्तिरस ओसंडून वाहत असून, विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.