मोबाईल रिचार्ज प्लॅन

मोबाईल ग्राहकांना मोठा दिलासा! डेटा प्लॅनची सक्ती थांबणार; फक्त कॉलिंग-SMSचा पर्याय मिळणार..

Mobile Recharge Plan: मोबाईल रिचार्ज करताना केवळ कॉलिंग आणि SMSची गरज असलेल्या ग्राहकांसाठी आता अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) दूरसंचार ग्राहक संरक्षण

मोबाईल ग्राहकांना मोठा दिलासा! डेटा प्लॅनची सक्ती थांबणार; फक्त कॉलिंग-SMSचा पर्याय मिळणार..

Mobile Recharge Plan

 

Jio-Airtel-Vi-BSNLला सरकारचा मोठा झटका!

नवी दिल्ली (Mobile Recharge Plan) : मोबाईल रिचार्ज करताना केवळ कॉलिंग आणि SMSची गरज असलेल्या ग्राहकांसाठी आता अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) दूरसंचार ग्राहक संरक्षण (13वी सुधारणा) विनियम, 2026 जारी केले आहेत. या नव्या नियमांनुसार दूरसंचार कंपन्यांना व्हॉइस आणि SMSसाठी स्वतंत्र विशेष टॅरिफ व्हाउचर उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत.

TRAIने यापूर्वी एप्रिल 2026 मध्ये या बदलांचा मसुदा प्रसिद्ध केला होता. (Mobile Recharge Plan) ग्राहकांना कमी कालावधीचे केवळ व्हॉइस आणि SMSचे पर्याय मिळावेत, या उद्देशाने हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. अंतिम नियम 22 सप्टेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आले.

डेटा प्लॅन घेण्याची गरज नाही..

नव्या नियमांमुळे (Mobile Recharge Plan) ज्यांना मोबाईलवर इंटरनेट डेटाची आवश्यकता नाही, अशा ग्राहकांना केवळ कॉलिंग आणि SMSचा समावेश असलेला रिचार्ज निवडता येणार आहे. त्यामुळे डेटा वापरत नसलेल्या ग्राहकांना त्यांच्या गरजेशी संबंधित नसलेल्या सेवांसाठी पैसे खर्च करण्याची गरज राहणार नाही. TRAIच्या निर्णयाचा विशेष फायदा फीचर फोन वापरणारे, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रामुख्याने कॉलिंगसाठी मोबाईल वापरणारे ग्राहक यांना होऊ शकतो. ग्राहकांना त्यांच्या वापरानुसार उपलब्ध पर्यायांमधून रिचार्ज निवडता येईल.

30 दिवसांच्या वैधतेचे पर्याय

TRAIच्या नव्या नियमांनुसार व्हॉइस आणि SMSसाठी स्वतंत्र विशेष टॅरिफ व्हाउचर उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. विविध वैधता कालावधीच्या व्हॉइस-SMS-डेटा पॅकसोबत त्याच वैधतेचा स्वतंत्र व्हॉइस-SMS पर्याय उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांना कमी कालावधीसाठीही स्वतंत्र व्हॉइस-SMS रिचार्ज निवडण्याचा पर्याय मिळणार आहे. रिचार्जच्या वैधतेनुसार ग्राहकांना त्यांच्या वापराशी जुळणारा प्लॅन निवडणे अधिक सोपे होणार आहे.

Jio, Airtel, Vi आणि BSNLसह कंपन्यांवर लागू

हे (Mobile Recharge Plan) नियम दूरसंचार सेवा पुरवठादारांसाठी लागू आहेत. त्यामुळे Jio, Airtel, Vi आणि BSNL यांसह संबंधित कंपन्यांना TRAIच्या नियमांनुसार व्हॉइस आणि SMSसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून द्यावे लागतील. एप्रिलमध्ये जारी केलेल्या मसुद्यात प्रत्येक संबंधित वैधता कालावधीसाठी व्हॉइस-SMSचा स्वतंत्र पर्याय देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

ग्राहकांना काय फायदा?

नव्या नियमांमुळे (Mobile Recharge Plan) मोबाईल ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार रिचार्ज निवडण्याची अधिक मुभा मिळणार आहे. डेटाचा वापर नसलेल्या ग्राहकांना केवळ कॉलिंग आणि SMSसाठी स्वतंत्र रिचार्जचा पर्याय, तर डेटा वापरणाऱ्या ग्राहकांना नेहमीप्रमाणे डेटा-सह प्लॅन निवडता येईल. त्यामुळे ग्राहकांना आपल्या वापर आणि बजेटनुसार रिचार्ज करण्याचे अधिक पर्याय उपलब्ध होतील.

संबंधित सामग्री

संगिताचे धडे दिलेल्या विद्यालयात आगीचे तांडव; कुटूंब बचावले

संगिताचे धडे दिलेल्या विद्यालयात आगीचे तांडव; कुटूंब बचावले

Sangit Sadhana Vidyalaya: शहरातील मारवाडी गल्लीत ५ ऑक्टोबर सोमवार, रोजी सायंकाळी गोपाल बासटवार यांच्या फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीने ८० वर्षीय ज्येष्ठ संगीत साधिका अनुराधाताई नांदेडकर

Oct 06, 2026
अविनाश बांगरच्या शौर्याचा शेवट; दुसर्‍यासाठी जीव दिला: स्वत काळाच्या पडद्या आड गेला

अविनाश बांगरच्या शौर्याचा शेवट; दुसर्‍यासाठी जीव दिला: स्वत काळाच्या पडद्या आड गेला

Avinash Bangar's death: हिंगोली येथे फटाक्याच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगी अविनाश काशिनाथ बांगर यांनी दुसर्‍यांचे प्राण वाचवण्यासाठी धाव घेतली आणि या प्रयत्नातच त्यांनी स्वतःचा प्राण गमावला.

Oct 06, 2026
तब्बल 40 कोटींची गाय! भारतीय वंशाच्या ‘वियाटिना-19’ची विक्रमी बोली

तब्बल 40 कोटींची गाय! भारतीय वंशाच्या ‘वियाटिना-19’ची विक्रमी बोली

Viatina-19 Cow Record: ब्राझीलमध्ये झालेल्या एका विशेष लिलावात भारतीय वंशाच्या नेल्लोर (ओंगोल) प्रजातीतील ‘वियाटिना-19’ या गायीने तब्बल 40 कोटी रुपयांची विक्रमी बोली, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Oct 06, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026