Breaking News
  • अमरावती जिल्ह्यातील आजपासून शाळा सकाळच्या सत्रात
  • मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाणीच पाणी
  • समृद्धी महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट, समृद्धी महामार्गावर काही वेळासाठी वाहतूक ठप्प
  • सिया गोयल हिचे तिच्या मैत्रीणसोबतचे चॅट व्हायरल
  • पुण्यातील कोंढवा परिसरात मोठी वाहतूक कोंडी
  • पुणे-सोलापूर महामार्गावर टेम्पोला आग
  • अंबरनाथ पूर्वेतील पार्किंगच्या ठेकेदारांचे ठेके रद्द!
  • शेतीत काम करणारी 'महिला' आता 'शेतकरी': आ. श्वेता महाले पाटील
  • E20: 'सरकारचे प्रयोग, जनतेची परीक्षा?'

होम > आणखी > तंत्रज्ञान

iPhone 18 Pro Max

Apple च्या आगामी फ्लॅगशिपमध्ये मिळणार आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी? समोर आली क्षमता

Apple च्या आगामी iPhone 18 Pro Max संदर्भातील नवीन लीकमुळे टेकविश्वात मोठी चर्चा सुरू झाली आहे.


apple च्या आगामी फ्लॅगशिपमध्ये मिळणार आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी समोर आली क्षमता

iPhone 18 Pro Max |

eSIM आणि फिजिकल सिम व्हेरिएंटनुसार बॅटरीत फरक असण्याची शक्यता; A20 Pro Bionic चिपमुळे बॅटरी बॅकअपही होणार अधिक प्रभावी

Apple च्या आगामी iPhone 18 Pro Max संदर्भातील नवीन लीकमुळे टेकविश्वात मोठी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये मागील पिढीच्या तुलनेत अधिक क्षमतेची बॅटरी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, eSIM आणि फिजिकल सिम अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये बॅटरीची क्षमता वेगवेगळी असू शकते. त्यामुळे दीर्घकाळ फोन वापरणारे, गेमिंग आणि मल्टिटास्किंग करणाऱ्या युजर्ससाठी हा मोठा बदल ठरू शकतो.

eSIM मॉडेलमध्ये सर्वाधिक क्षमतेची बॅटरी?

चिनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Weibo वर Duoge Internet Technology यांनी शेअर केलेल्या माहितीनुसार, ज्या देशांमध्ये Apple केवळ eSIM सपोर्ट देत आहे, त्या बाजारपेठांमध्ये iPhone 18 Pro Max मध्ये 5425mAh क्षमतेची बॅटरी मिळू शकते. तर फिजिकल नॅनो-सिम ट्रे असलेल्या देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या मॉडेलमध्ये 5235mAh बॅटरी दिली जाऊ शकते.

लीकमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, सिम ट्रे काढून टाकल्यामुळे फोनच्या आतील भागात अतिरिक्त जागा उपलब्ध होते आणि त्याचाच वापर मोठ्या बॅटरीसाठी करण्यात आला आहे.

iPhone 17 Pro Max पेक्षा मोठी झेप

गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या iPhone 17 Pro Max च्या फिजिकल सिम व्हर्जनमध्ये 4823mAh बॅटरी देण्यात आली होती. तर eSIM-Only मॉडेलमध्ये 5088mAh बॅटरी होती. या तुलनेत iPhone 18 Pro Max मध्ये दोन्ही व्हेरिएंटमध्ये बॅटरी क्षमतेत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

A20 Pro Bionic चिपसेटमुळे कार्यक्षमतेत वाढ

लीकनुसार, iPhone 18 Pro Max मध्ये Apple चा A20 Pro Bionic प्रोसेसर दिला जाऊ शकतो. हा चिपसेट 2nm मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसवर आधारित असण्याची शक्यता आहे. अधिक कार्यक्षम प्रोसेसर आणि वाढीव बॅटरी क्षमतेमुळे फोनचा बॅटरी बॅकअप आणि ऊर्जा व्यवस्थापन अधिक चांगले होऊ शकते.

iPhone 18 Pro मध्येही बॅटरी अपग्रेड

यापूर्वी समोर आलेल्या लीकनुसार, iPhone 18 Pro मॉडेलमध्येही बॅटरी क्षमता वाढवली जाणार आहे. फिजिकल सिम असलेल्या व्हर्जनमध्ये 4056mAh बॅटरी मिळण्याची शक्यता आहे, तर eSIM व्हेरिएंटमध्ये 4288mAh बॅटरी दिली जाऊ शकते.

तुलनेत, iPhone 17 Pro च्या फिजिकल सिम मॉडेलमध्ये 3998mAh आणि eSIM व्हर्जनमध्ये 4252mAh क्षमतेची बॅटरी उपलब्ध आहे. त्यामुळे आगामी मॉडेलमध्येही बॅटरीच्या बाबतीत सुधारणा पाहायला मिळू शकते.

Related to this topic: