Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आणखी > तंत्रज्ञान

भारतातील वापरकर्त्यांना अद्याप प्रतीक्षा;

टीव्हीवर येणार इन्स्टाग्राम; यूट्यूबला देणार नवी टक्कर

सॅमसंग टीव्हीवरही उपलब्ध होणार सेवा; सध्या फक्त अमेरिकेतच सुविधा


टीव्हीवर येणार इन्स्टाग्राम यूट्यूबला देणार नवी टक्कर

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम आता स्मार्टफोन आणि कॉम्प्युटरपुरता मर्यादित न राहता टीव्हीच्या मोठ्या पडद्यावरही विस्तार करण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहे. गेल्या वर्षी कंपनीने 'इन्स्टाग्राम फॉर टीव्ही' ही सेवा सुरू केली होती. सुरुवातीला ही सुविधा केवळ अमेरिकेतील ॲमेझॉन फायर टीव्ही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२६ मध्ये या सेवेचा विस्तार करण्यात आला आणि अमेरिकेतील गूगल टीव्हीवरही इन्स्टाग्राम रील्स पाहण्याची सुविधा उपलब्ध झाली.


आता सॅमसंग स्मार्ट टीव्हीवरही इन्स्टाग्राम पाहण्याची सुविधा देण्याची तयारी सुरू आहे. मात्र, हे नवीन फीचर सध्या फक्त अमेरिकेतील वापरकर्त्यांसाठीच उपलब्ध होणार असून भारतातील वापरकर्त्यांना यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.


स्मार्ट टीव्हीच्या वाढत्या वापरामुळे यूट्यूबने मोठ्या पडद्यावर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. त्याच धर्तीवर इन्स्टाग्रामही आता टीव्ही स्क्रीनवर आपली उपस्थिती मजबूत करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. यामुळे भविष्यात टीव्हीवरील व्हिडिओ स्ट्रीमिंग क्षेत्रात यूट्यूबसह इतर प्लॅटफॉर्मना स्पर्धा मिळण्याची शक्यता आहे.
इन्स्टाग्राम टीव्हीमध्ये वापरकर्त्यांना रील्स आणि स्टोरीजसारखी लोकप्रिय फीचर्स उपलब्ध करून दिली जात आहेत. तसेच, आतापर्यंत प्रामुख्याने स्क्वेअर किंवा व्हर्टिकल फॉरमॅटमध्ये असलेले व्हिडिओ आता टीव्ही स्क्रीन लक्षात घेऊन हॉरिझॉन्टल फॉरमॅटमध्येही सादर करण्याची चाचणी सुरू आहे.
याशिवाय, कंपनी आता केवळ शॉर्ट-फॉर्म व्हिडिओंपुरती मर्यादित न राहता लाँग-फॉर्म व्हिडिओंवरही भर देत आहे. यामुळे कंटेंट क्रिएटर्सना अधिक वेळेचे व्हिडिओ, कथाकथन आणि भागांमध्ये विभागलेल्या वेब-मालिकांसारखा दर्जेदार कंटेंट तयार करण्याची संधी मिळणार आहे.
मात्र, भारतातील वापरकर्त्यांसाठी ही सुविधा कधी उपलब्ध होणार, याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे भारतीय इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना या नव्या अनुभवासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

Related to this topic: