Breaking News
  • 'जगाच्या नकाशावर राहायचं की इतिहासजमा व्हायचं?'; पाकिस्तानला लष्करप्रमुखांचा थेट इशारा
  • यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची बदली
  • अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त
  • बुलढाण्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला
  • दिवे घाटात दहशत पसरवणाऱ्या बुलेट राजांचा माज पोलिसांनी मोडला!
  • शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
  • CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी
  • रत्नागिरी- जिल्ह्यात CNG GAS चा मोठ्या प्रमाणात तुटवडा
  • मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार;प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय

होम > क्राईम जगत

सेनगाव टोळी थरार

सेनगाव तालुक्यात टोळीचा थरार; स्कार्पिओ फोडली, सोन्याची साखळी लांबवली

Sengaon tribe thrill: सेनगाव पोलिस स्थानकाच्या हद्दीत एका टोळीने सशस्त्र हल्ला चढवून खळबळ उडवली. ६ तोळ्यांची सोन्याची साखळी हिसकावून आरोपी पसार.


सेनगाव तालुक्यात टोळीचा थरार स्कार्पिओ फोडली सोन्याची साखळी लांबवली

Sengaon tribe thrill |

सेनगाव (Sengaon tribe thrill) : सेनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिंबाळा तांडा परिसरात शुक्रवारी रात्री एका टोळीने लाठ्या-काठ्या आणि लोखंडी रॉडने सशस्त्र हल्ला चढवत मोठी खळबळ उडवून दिली. या हल्ल्यात एका ६ तोळ्यांची सोन्याची साखळी हिसकावण्यात आली असून, त्यांच्या स्कार्पिओ गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे. ऐन रात्री घडलेल्या या थरारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अशोक उद्धवराव घुगे  (रा. अंबरवाडी, जि. परभणी) हे शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास आपल्या स्कार्पिओ गाडीने (क्र. MH 22 AW 4400) लिंबाळा तांडा परिसरावरून जात होते. यावेळी (Sengaon tribe thrill) आरोपी शंकर मालू नवले, दामु नवले (रा. सावंगा म्हाळसा) आणि पाँली यांच्यासह इतर १० ते १२ जणांच्या बेकायदेशीर जमावाने त्यांना रस्त्यात अडवले. हातात लाठ्या, काठ्या, दगड आणि लोखंडी रॉड घेतलेल्या या जमावाने अचानक गाडीवर हल्ला चढवला. त्यांनी गाडीच्या काचा फोडून अशोक घुगे व त्यांच्यासोबत असलेल्यांना बाहेर ओढले. त्यानंतर शिवीगाळ करत त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याच गोंधळाचा फायदा घेत मुख्य आरोपीनी अशोक घुगे यांच्या गळ्यातील ६ तोळ्यांची सोन्याची साखळी जबरदस्तीने तोडून पळ काढला.

पोलिसांची तत्परता, आरोपी पसार

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ सेनगाव पोलिसांना पाचारण केले. घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस कर्मचारी पवन चाटसे आणि मारकर हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचे शासकीय वाहन येताना पाहताच आरोपींनी अंधाराचा फायदा घेत तिथून पळ काढला.

याप्रकरणी (Sengaon tribe thrill) सेनगाव पोलीस ठाण्यात अशोक घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच प्रा. विठ्ठलराव कंगणे यांनीही पोलीस ठाण्याला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास  पी. एम. चाटसे हे करत असून, फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी चक्रे फिरवली आहेत.

Related to this topic: