Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > करीअर

राज्य स्टुडंट पोर्टल

राज्यातील शाळांची एकाच वेळी पटपडताळणी; दुसरी ते आठवीबरोबर नववी, अकरावीच्याही परीक्षा?

State Student Portal: ११, १५ आणि २२ एप्रिल रोजी राज्यातील शाळांची पटपडताळणी आणि दुसरी ते आठवी, नववी आणि अकरावीच्या परीक्षा एकाच वेळी घेण्याचे आयोजन


राज्यातील शाळांची एकाच वेळी पटपडताळणी दुसरी ते आठवीबरोबर नववी अकरावीच्याही परीक्षा

State Student Portal |

११, १५ आणि २२ एप्रिल रोजी शिक्षण विभागाची पथके करणार शाळांची तपासणी; 'स्टुडंट पोर्टल'वर होणार नोंद

अमरावती (State Student Portal) : राज्यातील शाळांची नियतकालिक मूल्यांकन चाचणीदरम्यान पटपडताळणी करण्यात येणार आहे. त्यानुसार ११ एप्रिल, १५ एप्रिल आणि २२ एप्रिल या दिवशी शिक्षण विभागाचे पथक शाळांना भेट देऊन विद्यार्थी उपस्थितीचा आढावा घेऊन त्याची प्रणालीमध्ये नोंद करणार आहे.

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी या बाबत परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. (State Student Portal) राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे राज्यातील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार दुसरी ते आठवी या इयत्तांची ११ एप्रिल, १५ एप्रिल आणि २२ एप्रिल रोजी अनुक्रमे प्रथम भाषा, गणित आणि तृतीय भाषा या विषयाची परीक्षा घेतली जाणार आहे. याच काळात आता शाळांमध्ये पटपडताळणी प्रक्रियाही राबवली जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर परिपत्रकाद्वारे दिलेल्या सूचनांनुसार, इयत्ता दुसरी ते आठवीच्या वर्गाची पटपडताळणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने आयोजित केलेल्या पॅट परीक्षेच्या दिवशी म्हणजेच ११ एप्रिल, १५ एप्रिल, २२ एप्रिल रोजी करावी. इयत्ता नववीची मराठी गणित आणि इंग्रजी इयत्ता नववीची मराठी, गणित आणि इंग्रजी या विषयांची वार्षिक परीक्षा ११ एप्रिल, १५ एप्रिल, २२ एप्रिल रोजी आयोजित करावी. इयत्ता अकरावीची मराठी, भौतिकशास्त्र, इंग्रजी या विषयांची वार्षिक परीक्षाही (State Student Portal) याच दिवशी आयोजित करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

पटपडताळणीची प्रक्रिया एकाच वेळी पूर्ण करण्यासाठी नववी आणि अकरावीच्या परीक्षाही याच दिवशी आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील शाळा पटपडताळणीच्या अनुषंगाने 'स्टुडंट पोर्टल'वर मुख्याध्यापक लॉगिन, केंद्रप्रमुख लॉगिन, विस्तार अधिकारी लॉगिन, शिक्षणाधिकारी लॉगिनवर सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
पटपडताळणीसाठी शाळेला भेट देणारे पथक या लॉगिनचा वापर करून उपस्थित आणि अनुपस्थित विद्यार्थ्यांची नोंद करतील.

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ग्राह्य

दहावी, इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची (State Student Portal) पटपडताळणी करण्याची आवश्यकता नाही. राज्य मंडळाच्या परीक्षेतील विद्यार्थी उपस्थिती ग्राह्य धरली जाणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दाखल असणारे व हजेरी पञाकावर असलेले सर्व विद्यार्थी पटनिर्धारण करीता ग्राह्य धरण्यात यावे.तसेच काही कारणास्तव या तारखेला अनुपस्थित असल्यास मागिल हजेरी उपस्थिती नुसार ग्राहय धरण्यात यावी. या अगोदर शासनाने आधार कार्डवर शिक्षक निर्धारण केले होते त्यानुसार शिक्षकांचे निर्धारण करुन समायोजन पण केले. पण शिक्षक समितीने शासनाला वारंवार पटावर नोंदणी असणारे आणि शाळेत उपस्थिती असणारे विद्यार्थी यांच्यावर शिक्षक निर्धारण करण्यात यावे, अशी मागणी केली होती ती आता पूर्ण होणार असुन या तारखेला १००%विद्यार्थी उपस्थित ठेवावे असे आवाहन शिक्षक समितीने केले आहे.

Related to this topic: