Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ

काँग्रेस सूजन संघटन

“काँग्रेस सूजन संघटन अभियान” अंतर्गत पातूर येथे महत्त्वपूर्ण सभा

Congress Association: पातूर येथे आयोजित काँग्रेस सूजन संघटन अभियानात अनेक मान्यवरांची उपस्थिती. लोकशाही पद्धतीने जिल्हाध्यक्ष पदाची निवड. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य.


“काँग्रेस सूजन संघटन अभियान” अंतर्गत पातूर येथे महत्त्वपूर्ण सभा

Congress Association |

पातूर (Congress Association ) : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “काँग्रेस सूजन संघटन अभियान” अंतर्गत पातूर येथे महत्त्वपूर्ण सभेचे आयोजन करण्यात आले. पातूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल संगम लॉन येथे ही सभा उत्साहात पार पडली. या सभेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अकोला जिल्हा निरीक्षक तसेच आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष जी. रुद्राजी राजू प्रमुख उपस्थित होते. यावेळी निरीक्षक म्हणून संदेश सिंगलकर व दिलीप सरनाईक यांनीही सहभाग घेतला.

कार्यक्रमाची (Congress Association) सुरुवात पातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश गावंडे व शहराध्यक्ष शेख मुख्तार यांच्या हस्ते मान्यवरांच्या स्वागत व सत्काराने झाली. यानंतर जी. रुद्राजी राजू यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जिल्हाध्यक्ष पदाची निवड लोकशाही पद्धतीने करण्यात येणार असून, कार्यकर्त्यांच्या मतांना प्राधान्य दिले जाईल. इच्छुक उमेदवारांच्या नावांची शिफारस कार्यकर्त्यांनी निःसंकोचपणे मांडावी, असे आवाहन त्यांनी केले.

सभेदरम्यान (Congress Association) तालुका व शहराध्यक्ष पदांसाठी इच्छुकांकडून अर्ज स्वीकारण्यात आले. तसेच अकोला जिल्हाध्यक्ष पदासाठी नावांची शिफारस करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. बंद खोलीत प्रत्येक कार्यकर्त्याशी स्वतंत्र चर्चा करून त्यांच्या पसंतीच्या उमेदवारांची नोंद करण्यात आली.

या (Congress Association) कार्यक्रमास अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक अमानकर, काँग्रेस नेते प्रकाश तायडे, नाना देशमुख, हाजी सै. कमरोद्दीन, हिदायत खान, मोहम्मद शब्बीर भाई, हेमंत देशमुख, प्रशांत गावंडे, समाधान राठोड, राजाराम डाखोरे, रमेश भगत, बब्बू भाई, अज़गर भाई, राजेश अत्तरकार, मोहसिन खान, अनीक पटेल, मोहम्मद महताब, गुड्डू पहलवान, दौलतराव घुगे, भिमराव कोथलकर, अतुल अमानकर, मोहम्मद हयात जमदार, रंजनी ताई मुंडे, चंद्रकांत बारताशे, श्याम राठोड, मोहम्मद ज़फर, विजू गोतरकर, बंटी गहिलोत, रमेश सोलंके, गजानन अलाट, प्रशांत देशमुख, विलास हरमकार, अनिल महैसने, मोहम्मद शारीक यांच्यासह तालुका व शहरातील मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेमुळे काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Related to this topic: