Census Training: वसमतमध्ये जनगणना प्रशिक्षणास अनुपस्थित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस जारी. अनुपस्थित राहिलेल्या कर्मचार्यांना तीन दिवसात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वसमत (Census Training) : जनगणनेच्या पूर्वतयारीसाठी क्षेत्रीय प्रशिक्षक , प्रगणक, पर्यवेक्षक म्हणून नियुक्त असलेल्या कर्मचार्यांचे प्रशिक्षण वसमत मध्ये आयोजित करण्यात आले होते या प्रशिक्षणात गैरहजर राहणार्या कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तीन दिवसात लेखी खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मुख्याधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.
जनगणना २०२७ या (Census Training) राष्ट्रीय कार्याच्या पूर्वतयारीसाठी कर्मचार्यांचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत आहे. जनगणनेच्या कामासाठी शिक्षक व कर्मचार्यांना प्रगणक व पर्यवेक्षक अशा जबाबदार्या देण्यात आलेले आहेत. या कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यासाठी वसमत नगरपालिकेच्या वतीने प्राध्यापक दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृहात २३ ते २५ एप्रिल या कालावधीत प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. प्रगनक व पर्यवेक्षक म्हणून नियुक्त असलेल्या कर्मचार्यांना जनगणना करण्यासंदर्भातील प्रशिक्षण या प्रशिक्षण शिबिरात देण्यात आले. मात्र या जनगणना प्रशिक्षण शिबिरासाठी नियुक्त असूनही काही प्रगणक व पर्यवेक्षक प्रशिक्षणास अनुपस्थित राहिल्याचे आढळून आले. क्षेत्रीय प्रशिक्षक म्हणून नियुक्ती असलेल्या मुख्याधिकार्यांनी अनुपस्थित असलेल्या कर्मचार्यांना जनगणना अधिनियमा नुसार नोटीस बजावली आहे तीन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
जनगणना (Census Training) हे अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य असून, प्रशिक्षणास गैरहजेरीमुळे कामात अडथळा निर्माण होऊ शकतो हे माहित असूनही नियुक्त असलेले अनेक कर्मचारी गैरहजर राहिले त्याची गंभीर दखल घेण्यात आली मुख्याधिकार्यांनी बजावलेल्या नोटीस मध्ये तीन दिवसात खुलासा करण्याचे आदेश दिलेले आहेत दिलेल्या मुदतीत समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास संबंधितांविरुद्ध पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे मुख्याधिकार्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे गैरहजर राहिलेल्या कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली.