इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केल्यानंतर मागील ३ वर्षापासून एमपीएससी स्पर्धा परिक्षेची तयारी करीत असतांना यश मिळत नसल्यामुळे व्यथित होऊन सचिनने आत्महत्येचा मार्ग अवलंबविला.
उमरखेड (Competitive Exam) : इंजिनीयरिंग पदवी घेऊन मागील ३ वर्षापासून एमपीएससी स्पर्धा परिक्षेसाठी सातत्याने प्रयत्न करूनसुद्धा अपेक्षित यश न मिळाल्याने व्यथीत होऊन ३४ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ मार्च रोजी स्थानिक दयानंद कॉलनी, उमरखेड येथे घडली. सचिन अशोक शिंदे वय ३४ वर्षे रा दयानंद कॉलनी उमरखेड असे मृत्तकाचे नाव आहे.
मुळचा उंचेगाव तालुका हदगाव येथील रहिवाशी असलेला सचिन हा बरेच वर्षापासून आपल्या आईसोबत दयानंद कॉलनी उमरखेड येथे राहात होता. त्याचा भाऊ हदगाव येथे ग्रामसेवक आहे. इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केल्यानंतर मागील ३ वर्षापासून एमपीएससी स्पर्धा परिक्षेची तयारी करीत असतांना यश मिळत नसल्यामुळे व्यथित होऊन सचिनने आत्महत्येचा मार्ग अवलंबविला.