Collector Dr. India Bastewar: लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांची मुंबईला बदली करण्यात आली असून डॉ. भारत बास्टेवाड यांची त्यांच्या जागी नियुक्ती झाली आहे.
Collector Dr. India Bastewar |
वर्षा ठाकूर घुगे यांची मुंबईला बदली
लातूर (Collector Dr. India Bastewar) : लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांची मुंबई येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आयुक्त पदावर बदली झाली असून त्यांच्या जागी डॉ. भारत बास्टेवाड यांची बदली करण्यात आली आहे.
राज्य सरकारने गुरुवारी हे बदलीचे आदेश काढले. डॉ. भारत बास्टेवाड (Collector Dr. India Bastewar) हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असून लातूर यापूर्वी त्यांनी वेगवेगळ्या पदावर काम केल्याने लातूरचा त्यांना अभ्यास आहे. यामुळे लातूरच्या विकासाचे व्हिजन ते कशा पद्धतीने मांडतात, याकडे लातूरकरांचे लक्ष लागले आहे. बास्टेवाड हे नागपूर येथे मनरेगाचे आयुक्त होते. यापूर्वी त्यांनी उपजिल्हाधिकारी जिल्हा पुरवठा अधिकारी अशा पदांवर काम केल्याने प्रशासनाचा त्यांना दांडगा अनुभव आहे.
बॅचलर ऑफ व्हेटर्नरी सायन्सचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे. ते एक अनुभवी प्रशासकीय अधिकारी असून, त्यांनी यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद या पदावरही काम केले आहे.