Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > विदेश

Nepal Flood

नेपाळमध्ये पुराचा कहर; रसुवा जिल्ह्यात मोठी हानी, २८ पोलिसांसह १००० नागरिक वाहून गेल्याची माहिती

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.


नेपाळमध्ये पुराचा कहर रसुवा जिल्ह्यात मोठी हानी २८ पोलिसांसह १००० नागरिक वाहून गेल्याची माहिती

भोटे कोशी नदीला रौद्ररूप; स्याफ्रुबेसी आणि तिमुरे भागांना सर्वाधिक फटका, भारतातील बिहारपर्यंत पुराचा परिणाम होण्याची शक्यता

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. तिबेटच्या सीमेलगत असलेल्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी आलेल्या पुरामुळे अनेक गावांना मोठा फटका बसला असून, मूलभूत सुविधांच्या विविध प्रकल्पांचेही नुकसान झाले आहे. स्याफ्रुबेसी आणि तिमुरे परिसरात पुराचा सर्वाधिक परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या पुरात २८ पोलिसांसह सुमारे १००० नागरिक वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. पुरामुळे झालेल्या नुकसानीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यातून परिस्थितीची भीषणता समोर येत आहे.

नेपाळमधील भोटे कोशी नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक घरे आणि प्रकल्प पुराच्या पाण्याच्या तडाख्यात सापडले. नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित आणि उंच ठिकाणी स्थलांतरित होण्याचा सल्ला दिला आहे.

पुराच्या प्रवाहामुळे नदीकाठची अनेक घरे अक्षरशः वाहून गेली असून, अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन सखल भागातील नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नदीलगतच्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी आणि परिस्थिती बिघडल्यास तातडीने सुरक्षित उंच ठिकाणी जावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

दरम्यान, नेपाळचे पंतप्रधान बलेंद्र शाह यांनी पूरग्रस्त भागात मदत आणि बचावकार्य वेगाने राबवण्यासाठी पोलिस तसेच लष्करासह बचाव पथके तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाकडून पूरस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, बाधित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

भारतावरही परिणाम होण्याची शक्यता

नेपाळमधील या पुराचा परिणाम केवळ त्या देशापुरता मर्यादित राहण्याची शक्यता नाही. भोटे कोशी नदीचा उगम तिबेटमध्ये होतो. पुढे ही नदी नेपाळमध्ये त्रिशुली नदीला मिळते. त्यानंतर त्रिशुलीचे पाणी गंडक नदीच्या माध्यमातून भारतात प्रवेश करते.

त्यामुळे नेपाळमध्ये अचानक निर्माण झालेल्या पुराच्या परिस्थितीचा परिणाम भारतातील नदीपात्रांवरही होऊ शकतो. नेपाळमधून येणारी ही नदी बिहारमधून वाहते. पाण्याचा प्रवाह असाच वाढत राहिल्यास बिहारमधील गंडक नदीच्या पाणीपातळीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मात्र, सध्याच्या पुरातील किती पाणी भारतात पोहोचेल आणि त्याचा नेमका परिणाम किती गंभीर असेल, हे या टप्प्यावर निश्चितपणे सांगता येणार नाही.

Related to this topic: