Breaking News
  • मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण, संगमनेरमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल
  • धाराशिवमध्ये 4 गावातील मराठा समाजाचे गावकरी आक्रमक,रास्ता रोको आंदोलन
  • पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
  • आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी
  • मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट, नशिराबादेत चेन्नई सायबर क्राईमची धडक!
  • लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड
  • नंदुरबारमध्ये 93 लाखांचा 186 किलो गांजा जप्त
  • OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत
  • माकडांमुळे शाळा बंद, विद्यार्थी व शिक्षक शाळा सोडून पळाले

होम > विदेश

Hungary Bus Accident

हंगेरीत भीषण बस अपघात; 12 जणांचा मृत्यू, 10 प्रवासी गंभीर जखमी

​​​​​​​हंगेरीमध्ये रविवारी पहाटे प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 12 जणांचा मृत्यू झाला आहे.


हंगेरीत भीषण बस अपघात 12 जणांचा मृत्यू 10 प्रवासी गंभीर जखमी

Hungary Bus Accident |

पहाटे 1 वाजता बुडापेस्टपासून 140 किमी अंतरावर दुर्घटना; चालकाला डुलकी लागल्याचा प्राथमिक अंदाज

हंगेरीमध्ये रविवारी पहाटे प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 12 जणांचा मृत्यू झाला आहे. रस्त्यावरून घसरलेली बस महामार्गालगतच्या खड्ड्यात जाऊन पलटी झाल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 10 जण गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

ही दुर्घटना रविवारी पहाटे सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास घडली. हंगेरीची राजधानी बुडापेस्टपासून जवळपास 140 किलोमीटर अंतरावर बसचा ताबा सुटला आणि ती रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळून उलटली. प्राथमिक माहितीनुसार, चालकाला डुलकी लागल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले असावे, असा अंदाज तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मदत आणि बचाव पथके दाखल झाली. जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे. अपघाताच्या कारणांचा अधिक तपास केला जात आहे.

या दुर्घटनेबद्दल पोलंडचे पंतप्रधान पीटर मॅग्यार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केले. मृतांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या. तसेच दुर्घटनास्थळी मदतकार्य आणि बचाव मोहिमेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.

पोलंडचे राष्ट्राध्यक्ष कॅरोल नवरोकी आणि परराष्ट्र मंत्री राडोस्लाव सिकोरस्की यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. पोलिस आणि वाणिज्य दूतावासाची टीम हंगेरीतील संबंधित अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.

Related to this topic: