Djibouti Migrant Boat Accident

जिबूतीच्या किनाऱ्यावर प्रवाशांनी भरलेली बोट उलटली; १३९ जणांचा मृत्यू, ८४ बेपत्ता

जिबूतीच्या किनाऱ्यावर बोट दुर्घटनेत १३९ जणांचा मृत्यू, ८४ बेपत्ता; IOM कडून माहिती, बचावकार्य सुरू.

जिबूतीच्या किनाऱ्यावर प्रवाशांनी भरलेली बोट उलटली; १३९ जणांचा मृत्यू, ८४ बेपत्ता

Djibouti Migrant Boat Accident

३०५ प्रवाशांचा प्रवास ठरला जीवघेणा; मृतांमध्ये १५ लहान मुलांचा समावेश, बचावकार्य सुरू

पूर्व आफ्रिकेतील जिबूतीच्या किनारपट्टीजवळ प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात उलटल्याने भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत किमान १३९ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये १५ लहान मुलांचाही समावेश आहे. बोटीतील एकूण ३०५ प्रवाशांपैकी ८४ जण अद्याप बेपत्ता आहेत. तर ८० हून अधिक प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले आहे. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी सध्या मोहीम राबवली जात आहे.

इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (IOM) या आंतरराष्ट्रीय संस्थेने रविवारी या दुर्घटनेची माहिती दिली. उपलब्ध माहितीनुसार, जिबूतीहून येमेनच्या दिशेने निघालेल्या या बोटीला गुरुवारी रात्री ते शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान अपघात झाला.

३०५ प्रवाशांच्या बोटीला जलसमाधी; मृतांचा आकडा चिंताजनक

जिबूतीच्या किनाऱ्याजवळ घडलेल्या या दुर्घटनेमुळे मोठी जीवितहानी झाली आहे. बोटीवरील प्रवाशांपैकी १३९ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून, ८४ जणांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. मृतांमध्ये १५ बालकांचा समावेश असल्याने या दुर्घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे. दुसरीकडे, ८० पेक्षा अधिक प्रवाशांचे प्राण वाचवण्यात आले असून, उर्वरित बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

रोजगाराच्या शोधात जिबूतीमार्गे येमेनकडे प्रवास

आफ्रिकेतील अनेक नागरिक रोजगाराच्या संधी आणि चांगल्या जीवनमानाच्या अपेक्षेने जिबूतीमार्गे येमेनकडे समुद्री प्रवास करतात. येमेनमध्ये पोहोचल्यानंतर बाब-अल-मंदेब या अरुंद सागरी मार्गातून पुढे आखाती देशांमध्ये जाण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मात्र, या मार्गावरील प्रवासात अनेक प्रकारचे धोके असून, बोट दुर्घटनेमुळे स्थलांतरितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या घटनेबद्दल जिबूतीमधील IOM चे प्रमुख अलेक्झांडर कोयसॅक यांनी दुःख व्यक्त केले आहे. रोजगार आणि आर्थिक स्थैर्याच्या शोधात स्थलांतर करणाऱ्या नागरिकांना अशा धोकादायक प्रवासाला सामोरे जावे लागत असल्याचे या दुर्घटनेने अधोरेखित केले आहे.

बाब-अल-मंदेब सागरी मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न गंभीर

दरम्यान, बाब-अल-मंदेब आणि त्याच्या आसपासच्या सागरी क्षेत्रात हूतींकडून हल्ले सुरू असल्याचे सांगितले जात आहे. जागतिक जहाज वाहतुकीच्या दृष्टीने हा सागरी मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या मार्गाचा वापर आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. होर्मुझच्या सामुद्रधुनीला पर्यायी मार्ग म्हणूनही बाब-अल-मंदेब परिसराचे महत्त्व आहे.

इराणसोबत सुरू असलेल्या तणावामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांची वाहतूक आधीच कमी झाली आहे. अशा परिस्थितीत लाल समुद्र आणि बाब-अल-मंदेब परिसरातील घडामोडींवर आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष केंद्रित झाले आहे. या भागातील अस्थिरता आणि सुरक्षेशी संबंधित घटनांचा परिणाम केवळ स्थानिक परिस्थितीवरच नव्हे, तर जागतिक सागरी वाहतूक आणि व्यापारावरही होण्याची शक्यता आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीत पशुधनासाठी कुटार राखीव; बायोमास ब्रिकेट्स निर्मिती आणि अवैध साठेबाजीवर बंदी

हिंगोलीत पशुधनासाठी कुटार राखीव; बायोमास ब्रिकेट्स निर्मिती आणि अवैध साठेबाजीवर बंदी

हिंगोलीत पशुधनासाठी कुटार राखीव; बायोमास ब्रिकेट्स निर्मिती, अवैध साठेबाजी आणि विनापरवानगी वाहतुकीवर बंदी. उल्लंघन केल्यास जप्ती व कायदेशीर कारवाई.

Oct 16, 2026
LPG बाबत नवे नियम; अनुदानासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य!

LPG बाबत नवे नियम; अनुदानासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य!

LPG Aadhaar Biometric: ऑक्टोबर 2026 पासून अनुदानासह नियंत्रित दरात एलपीजी रिफिल मिळवण्यासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण (BAA) पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले: पेट्रोलियम- नैसर्गिक वायू मंत्रालय

Sep 21, 2026
रोहिणी हत्याकांडातून धडा; घराच्या सुरक्षेसाठी स्मार्ट लॉक किती महत्त्वाचे?

रोहिणी हत्याकांडातून धडा; घराच्या सुरक्षेसाठी स्मार्ट लॉक किती महत्त्वाचे?

दिल्लीतील रोहिणी सेक्टर-3 येथील राकेश खन्ना हत्याकांडाच्या तपासात ड्युप्लिकेट चावीचा धक्कादायक वापर समोर आला आहे.

Sep 02, 2026
जीपीएस, बायोमॅट्रीक प्रणालीतून ग्रामसेवकांची हजेरी सक्तीची!

जीपीएस, बायोमॅट्रीक प्रणालीतून ग्रामसेवकांची हजेरी सक्तीची!

GPS-Biometric Attendance: जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या हजेरी प्रणाली बाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. ग्रामविकास विभागाने याबाबत पुन्हा आदेश

Aug 21, 2026