Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > क्रीडा

खेलो इंडिया कबड्डी

वाशिम जिल्ह्याचा दुहेरी अभिमान

Khelo India Kabaddi: मनोज राठोड खेलो इंडिया महिला कबड्डी संघाचे प्रशिक्षक तर सलोनी शिंदे कबड्डी संघात निवडल्या गेल्या. यामुळे वाशिम जिल्ह्याचा मान उंचावला.


वाशिम जिल्ह्याचा दुहेरी अभिमान

Khelo India Kabaddi |

मनोज राठोड खेलो इंडिया महिला संघाचे प्रशिक्षक,
तर सलोनी शिंदेची खेलो इंडिया कबड्डीत संघात निवड!

मानोरा (Khelo India Kabaddi) : तालुक्यातील देवठाणा गावासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. तालुक्याचे क्रीडाभूषण मनोज प्रकाश राठोड यांची भारत सरकारच्या प्रतिष्ठित खेलो इंडिया कबड्डी स्पर्धेसाठी महिला संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. ही स्पर्धा रायपूर (छत्तीसगड) येथे पार पडणार आहे. याचबरोबर देवठाणा येथील जय सेवालाल क्रीडा मंडळातील कु. सलोनी गजानन शिंदे हिची देखील खेळाडू म्हणून निवड झाल्याने तालुक्याचा मान उंचावला आहे.

मनोज राठोड हे इंदिरा गांधी कन्या विद्यालय, मानोरा येथे कार्यरत असून त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत अनेक गोरगरिब खेळाडूंना घडवले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. जय सेवालाल क्रीडा मंडळाच्या माध्यमातून त्यांनी उभारलेली क्रीडा चळवळ आज मानोरा तालुक्याची ओळख बनली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचा आणि प्रामाणिक कार्याचा गौरव म्हणूनच त्यांची महिला संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.

तसेच सलोनी शिंदे हिच्या निवडीमुळे तालुक्यातील महिला क्रीडापटूंना नवी दिशा आणि प्रेरणा मिळाली आहे. ही निवड विदर्भ ॲम्युचर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्रसिंह ठाकूर आणि मार्गदर्शक सतीशराव डफळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांच्या या यशाबद्दल (Khelo India Kabaddi) वाशिम जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ नवघरे, राजू अढाऊ, डॉ. भागवत महल्ले तसेच विदर्भ ॲम्युचर कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी, जय सेवालाल क्रीडा मंडळाचे सदस्य आणि जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मानोरा तालुक्यासाठी ही दुहेरी आनंदाची व अभिमानाची बाब ठरली असून, या यशामुळे तालुक्यातील युवक - युवतींना क्रीडा क्षेत्रात मोठी झेप घेण्यासाठी नवी प्रेरणा मिळत आहे. ग्रामीण भागातूनही मोठे यश मिळवता येते, याचे हे ज्वलंत उदाहरण ठरत आहे.

Related to this topic: