Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > क्रीडा

व्हीपीएल वैभवी जाधव

व्हीपीएल स्पर्धेत वैभवी जाधवचे यश...इंडिया वॉरियर्स संघाची विजेतेपदावर मोहोर!

Vaishnavi Jadhav VPL Tournament: वैभवी जाधवने इंडियावरीर्सला व्हीपील चषक विजय देऊन बुलढाण्याच्या क्रिकेट इतिहासावर प्रकाश टाकला. तिचा उत्कृष्ट प्रदर्शन हा क्रिकेटप्रेमींची नाविन्यपूर्ण कामगिरी.


व्हीपीएल स्पर्धेत वैभवी जाधवचे यशइंडिया वॉरियर्स संघाची विजेतेपदावर मोहोर

Vaishnavi Jadhav VPL Tournament |

बुलढाणा (Vaishnavi Jadhav VPL Tournament) : विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या व्हीपीएल (VPL) स्पर्धेत (VPL Tournament) बुलढाण्याची कन्या वैभवी जाधव (Vaishnavi Jadhav) हिने उल्लेखनीय कामगिरी करत इंडिया वॉरियर्स संघातून खेळत 2026 च्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळीच्या जोरावर इंडिया वॉरियर्स संघाने व्हीपीएल चषक पटकावला. या यशाबद्दल संघाला विजेतेपदाचा चषक व सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

वैभवी जाधव (Vaishnavi Jadhav) हिच्या या यशामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. इंडिया वॉरियर्स संघाने 2026 च्या व्हीपीएल स्पर्धेचे विजेतेपद पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

या यशाबद्दल धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड, माजी सभापती गणेश बस्सी, वैभवीचे वडील प्रवीण जाधव, तसेच श्रीकृष्ण शिंदे, रोहित गवळी आणि भिमराज पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन वैभवीचे अभिनंदन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही यश मिळविण्याचा विश्वास व्यक्त केला.