Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > संपादकीय > लेख

गुदगुल्या

जंगली जनावराईचे चेळे, व्हतात शेतकऱ्याच्या कायजाचे येले! सरकारच्या हेंबाळ्या चेंढायन्यानं शेतकरी जीवानं मेले!

औंदा तं राजा बेज्याच शेतकरी ‘संकटात’ फसेल हाये! या काया मातीतल्या  हेलपाट्याले हरेक कास्तकार कटायला! जो-तो शायना राजोटा येते अन कास्तकाराच्या कपायावर ‘टिकली’ फोळून पयते?


जंगली जनावराईचे चेळे व्हतात शेतकऱ्याच्या कायजाचे येले
सरकारच्या हेंबाळ्या चेंढायन्यानं शेतकरी जीवानं मेले

उरे ओ शेंड्यावरचे जानुआबा, उरे बुळातल्या जनतेवर ध्यान हाये की नाई बावा तुमचं? का वदरच्या वदरच जंतर-मंतरवर नजर ठुन ‘छुशाॅ’चे मंतर मारुन लोकाईचे संकटं दुर करता! मले तं काई खरं दिसत नाई आता या ताकदबाज भारताचं! या बिघळेल होल ईंडियाचं, लेकराईच्या शिक्शनाचं ‘पानदान’ वाजून रायलं तरी तुमाले ‘चेव’ आला नाई! त्या जंतरमंतरवर पायना कसे जवान पोराईले मारु मारु पोलीस घोयसून रायले? जसं काई ईच्यामायले ‘युद्ध’ चालू हाये वाट्टे! गरीब पोट्टे आंदोलनात मरतात अन राजोटे खुर्चीत बसून ‘मलाई’ चोकतात? येकखेप युवापिळीच्या तयपायातली आग मस्तकात गेली का लौकर ईजत नाई बरं, मंग तुमी कीतीबी खोट्या आश्वासनाचं पानी ओतलं तरी ते ‘आग’ आखीन जोऱ्यानं भळकते! जरा संभावून रा बावा! ईद्यार्थी हे ‘बीनदाती’ गोऱ्यावानी असतात! तेईले हिसोबा-हिसोबानंच  ‘सुतीपाती’ लावाची जबाबदारी सरकारची असते? दिल्लीतला ‘तितंबा’ पावून माया मनात शंका आली, का हे कोन्त्या ‘ग्यारंटीचं’ राजकारन हाये? बेज्याच ‘दांगळो’ चालु हाये ना राजधानीत! फुरसत भेटली का उलसक बुळातल्या शेतकऱ्यावर नजर टाकत जा ना! औंदा तं राजा बेज्याच शेतकरी ‘संकटात’ फसेल हाये! या काया मातीतल्या  हेलपाट्याले हरेक कास्तकार कटायला! जो-तो शायना राजोटा येते अन कास्तकाराच्या कपायावर ‘टिकली’ फोळून पयते? तेच्यात या ‘चारपाया’च्या अन ‘दोनपाया’च्या जंगली जनावराईच्या ‘चेळ्या’नं कास्तकार बेज्याच भेदारला! वावरं पेरल्याबराबर रातच्यानं या हेंबाळ्या डुकराईची कास्तकाराले सोकारी करा लागते! बराब्बर चतरे डुकरं ससरीचे सोयाबीनातलं तुरीचं तास ओयखून मातीत तोंड खुपसून या मेरीवून त्या मेरीलोग सफाचट करतात! या जनावरासाठी मिरगात तुरीच्या ‘घुगऱ्या’ खायाची येखांदी फुकटी ‘सरकारमान्य’ नवी योजना काळा बरं? येवळ्या म्हागाईत डुकराईनं वावरं सफाचट केल्यावर दुबार पेरनी कास्तकारानं कशी करावं? म्हनून थं या डुकराईच्या चेळ्यानं मुंग, उळीद, जेवारी पेरनं सोळलं बावा!  पहाळातले झाळंझुळपं तोळल्यानं हे यैदी-फुकटे ‘सरकारी’ पावने सीधेसाट ‘बापाचा माल’ समजून वावराईनं मोकाट हिंडतात! घळीभऱ्यात नंबरच्या नंबरं सफाचट करतात! डुकरं झाले का रोईट्याची ग्याॅंग येते, मंग वान्नेरं-हरनं बारोमास ईच्यामायले वावरात संसद भवनातली खासदार-आमदारावानी ‘क्याॅटिंग’ समजून ‘चरत’ रायतात! पयलेच तं शेतकऱ्याले सरकारी चेळेईचा घाटा नाई! कई कर्जमाफीचे चेळे तं कई वदरच्या पान्याच्यानं येले, कई पिकईमा तं कई केवायसीची झंझट, कई खताची टंचाई तं कई नकली बीयान्याच्या कंपन्याईचा ‘ढोरकोंबा’? ईतक्या डेंजर  झोनातल्या अरकाट ‘संकटावर संकट’ शेतकऱ्यावर आदयल्यानं शेती वायनं म्हंजे अंदमान- निकोबारच्या काया पान्याची ‘सजा’ झाली अन् तुमाले कास्तकाराच्या ‘चेंढायन्या’ कराची आदत पळली? अशा सरकारी चेळ्याईनं कास्तकाराच्या खाल्ला घास आंगी लागत नाई! पयलेच तो सरकारी चेळेईनं म्याट व्हते अन् त्याच्या उरावर बोकांडेल म्हागाई, चौपट मजुरी, उरफाटी सोकारी अशा ‘तितंब्यानं बिचारा जीनगानीभर कर्जबाजारी व्हते? असी ‘वास्तव जीनगानी’ कास्तकाराच्या माथी या हेंबाळ्या सरकारनं मारेल हाये?
बेज्याच कावला हो शेतकरी या निसर्गाच्या सरकारी ‘पावन्याईले’ म्हंजे जंगली जनावराईले! भलकसे ‘अरकाट’ हायेत ससरीचे! कीतीबी रातदिवसा सोकारी करा पन ‘नजर चुकली का दुर्घटना घळली’ समजा! आता काय शेतकऱ्यानं च्या-पानी भाकरतुकळ्याची ‘शिदोरी’ आन्यालेबी घरी जावावं नाई काय? जसं काई ईच्यामायले गरीब जनतेवानी या हेंबाळ्या सरकारनं जनावराईले ‘राशनच्या’ दुकानावानी वावरात ‘फुकट’ खायाची योजनाच चालु केली वाट्टे? आजकाल तं सरकारी ‘फुकटं धोरना’ची जशी काई ‘त्सुनामी’ आली! फक्त शेतकरी सोळून ज्याले-त्याले ‘लाळकपनाची’ गाभुयेल चिच दाखोवून सरकार जनतेच्या तोंडाले ‘पानी’ सोळते! सरकारी काम म्हंजे ‘योजना डोंगरायेवळी, बुळात व्हते मुंगीयेवळी’, फक्त गरीबाच्या नावानं करतात ‘तिजोरी’ खाली? पयलेच तं झळीपान्याचं गाट्याकुट्यात अनवानी तंगळ्यानं वावरात हिंडनं म्हंजे कास्तकाराले जीव मुठीत धरून चाला लागते! पन पोटातल्या ‘भुकीसाठी’ हे हेलपाटे शेतकऱ्याले जलमभर घ्याच लागतात! अबे ओ बाबुराव, बस करनं तुवं शानपन शिकोनं! बरं झालं बह्याळ्या चामळ्याचं मापुल हाये! खापराचं असतं तं येका गदन्यात फोळलं असतं!  नव्यापीळीच्या हातात कास्तकारी देली का घरबसल्या मोबाईल हाती घीवून हेंबाळे पोट्टे शेती कराले पायतात! अबे मायावानी बुडेबाडे जीते हायेत म्हनून हे कष्टाची ‘धनदौलत’ उभी हाये! नाई थं आतालोग त्या सोंगाळ्या अदानी-अंबानीले वावर ईकून मोकये झालो असतो! तुयावानी अयदी रानबोक्याईची नवी पीळी फक्त होबासक्या करु-करुच वाया चालली! हे कायामातीच्या धनाची ‘धनदौलत’ बापजाद्याईनं पिळ्या न् पीळ्या पुळच्या पिळीसाठी टिकून ठुली म्हनून साऱ्या जगाच्या पोटातली ‘भुक’ भागून रायली! पन आता नव्या पिळीच्या अयदीपनाले, रसायन खताच्या भक्तीले, मोबाईलच्या संगतीले, मातीत घाम कष्ट करनारे बुडेबाडे लय कटायले! गळेहो, नव्यापिळीले गाट्याकुट्यात पाय फसोनं पटत नाई, ईचुकाट्याच्या सगरानं अनवानी पायानं चालनं खपत नाई पन लगन झाल्यावर घरच्या भुलजीसंग पायन्यात ‘झोके-मुके’ घेता-घेता, मोबाईलात हवामान खात्याचे अंदाज घेनं, बीना बैलाची भाळ्याच्या यंत्राची शेती करनंच आवळते? अबे छत्तीसरंग्या अयदी बाबुराव, शेतीत हेलपाटे घेनं म्हंजे ‘ज्याची कायजातून ठनकते त्यालेच अंदरलं ‘दुखनं’ मालुम असते!’ आजकाल कास्तकाराले या जंगली जनावराईची सोकारी करनं म्हंजे रातभर ‘आरपार’ ची लळाई खेयनच झालं! आता कालच पाय माया घरी येकादशीचं किर्तन व्हतं, पांडुरंगाच्या भावभक्तीत मनं लावावं म्हनून म्या वावरातल्या सोकारीले ‘कानाडोया’ केला! पन झाकटीत चकराले गेलो तं अगाईताचा ‘तालतंबोरा’ पावून मी अचंब्यात पळलो! म्हंजे येका राती जर घरमालकानं वावरात ‘चीत घातलं नाई तं कीती ईचकाइंधन व्हते! पयलेच पहाळाईनं जगनारे जंगली जनावरं आता थेट कास्तकाराच्या पिकावरच डल्ला मारुन रायले! मानुस राती घळीभर सोकारीले गेला नाई तं हे हरनं-डुकरं, रोयटे- वान्नेरं घळीभऱ्यात वावराची ‘उलंगवाळी’ करतात! दामदुप्पटनं वाळेल म्हागाई, चौपट मजुरीनं कास्तकाराचं कंम्बळ्ळ मोळलं! अन् आता या जंगली जनावराईच्या सोकारीचा नवाच ‘खुटीउपळ धंदा’ कास्तकाराच्या जीवावर उठला!  पयले जुने कास्तकार असे कीतीकई संकटं आले तं कायजात हुंदका गीवत व्हते पन आताची मोबाईलचे मुके घेनारी नवी पिळी हा सोकारीचा ‘ईचुकाटा’ सईन करील काय? पयले येकट्या-दुकट्या जनावरानं पोटभर खाल्लं तरी शेतकऱ्याले दुखं नोतं! पन आता तं ईच्यामायले खंड्याईनं लोकसंख्या वाळेल हे जंगली डुकरं-हरनं, रोयटे, वान्नेरं घळीभर सोकारी नसला तं नंबराच्या नंबराची च्याटी करतात! पयले काय असे जनावरं नोते काय पन आता मान्साची लोकसंख्या घटली अन् फुकटची सरकारमान्य जनावराची संख्या ‘शंभरपट’ वाळली! त्याच्यानं आता शेतीमातीचा ‘खोटा धंदा’ कराले शेतकऱ्याले अजिबात पुरत नाई! पन गळेहो, त्या जगाच्या ‘पोशिंद्या’नं जर का मातीत हेलपाटे घेनं सोळलं थं आपून काया मातीचे ‘गोये’ खावून जीते रायसाल काय? गळेहो शेतकऱ्याचे ‘चेळे लावून येले’ करापरस त्याले जगन्याची ‘हिम्मत’ द्या, नाईतर तो जसा या संकटाईनं ‘गयफास’ घीवून मरते
तसे आपून पोटातल्या ‘भुकी’साठी 
तळफू-तळफू आपोआप मरु...??
 

अरुण मोडक
मो. नं.: ९८२२५९३९४७ 

Related to this topic: