रविवार दि. १५ मार्च २०२६ रोजी प्रकाशित झालेला 'युद्ध' केवळ बहाणा आहे, 'लूटमार' हेच लक्ष्य आहे !
प्रहार
रविवार दि. १५ मार्च २०२६ रोजी प्रकाशित झालेला 'युद्ध' केवळ बहाणा आहे, 'लूटमार' हेच लक्ष्य आहे !, हा 'प्रहार' आपण वाचला असेल, तर आपल्या लक्षात येईल, की सरकार जनतेला कसे फसवत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'हडेलहप्पी राजकारणा' चे एका 'इझम' मध्ये (भांडवलशाहीची एक विशिष्ट विचारसरणी) झालेलं रूपांतर आज जग अनुभवत आहे.
(Government Criticism) २०१४ पासून भारतात नरेंद्र मोदी सरकारचा उदय झाल्यापासून ते आजपर्यंत भारतातील सामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, कामगार, बेरोजगार विद्यार्थी यांच्या आयुष्यात एक प्रकारे ग्रहणच लागले आहे. त्यात आता नुकतेच मोदी यांचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले आणि मोदी हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या इशाऱ्याने भारतात कारभार हाकत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूचनेनुसार भारताने आपल्या जुन्या मित्र राष्ट्रांशी वैर प्रस्थापित केले आहे. आणि शत्रू राष्ट्रांशी मित्रत्व अजून प्रस्थापित व्हायचे आहे.
युद्धाचे कारण पुढे करत आज इंधन, गॅस महागात तरी पडत आहे किंवा त्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळाबाजार सुरू आहे आणि त्याचा भुर्दंड सामान्य जनतेला पडत आहे, मग हे सरकारचे अपयश नव्हे का? पूर्वी जो इराण तेलाच्या बाबतीत आणि रशिया शस्त्र पुरवठ्याच्या बाबतीत आपले मित्र होते, ते आता दूर गेलेत आणि आपण या ट्रम्पच्या नादी लागून आपले मित्र राष्ट्र गमावल्यात जमा आहे. मोदी सरकार या अपयशाचे खापर सध्या सुरू असलेल्या इस्रायल-अमेरिका यांच्या इराणशी सुरू असलेल्या युद्धावर फोडत आहे. वास्तविक त्याचा काहीही संबंध भारताशी नाही. जर इराण आपला पूर्वीपासूनचा मित्र देश आहे, तर इराण आपल्याला इंधन पुरवठा करणारच. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इराणने आपल्याला स्वस्तात इंधन पुरवठा केला आहे आणि तोसुद्धा भारतीय रुपयात, आणि त्याबदल्यात इराण आपल्याकडून शेतीमाल विकत घेत असायचा, म्हणजे वस्तू विनिमय, अर्थात 'बार्टर'. आज आपण अमेरिकेशी मैत्री करून हे सगळे 'क्रेडिट' गमावले आहे.
एकीकडे भारताचे मोदी सरकार सांगतेय की देशात इंधनाची टंचाई नाही, तर दुसरीकडे त्यांचीच गोदी मीडिया सांगतेय, की युद्धसदृश्य परिस्थितीमध्ये गॅस, पेट्रोल-डिझेल मिळणार नाही. आता तर अशी अफवा उडवली गेली आहे, की पेट्रोल पंप ठराविक वेळेतच उघडी राहणार, त्यामुळे सकाळी सकाळी पंपावर प्रचंड झुंबड होते आहे. याला कारणीभूत ही गोदी मीडिया आणि त्यांच्या बातम्या आहेत. आता हे गॅस, पेट्रोल-डिझेलचे भाव वाढविण्यासाठी हे कृत्रिम टंचाईचे कुंभाड भाजप सरकारने रचले असल्याचे ओळखण्यात येणार नाही; इतकी जनता दुधखुळी नाही.
भारताचे पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक स्वभाव आहे, की त्यांच्या ऐयाश वृत्तीपुढे त्यांना जनतेच्या समस्यांचे काहीही भान राहत नाही. आपलेच पंतप्रधान देश-विदेश दौरे करून तिथे मोठ्या थाटात ऐयाशपणे वावरतात. मात्र, अनेक विदेश दौरे करून त्यांनी काय साध्य केले, तर अमेरिकेच्या दबावाखाली पूर्वी अमेरिका जे केवळ ३ टक्के टॅरिफ आपल्या वर लावत होती ते आता १८ टक्के लादल्या गेले आहे, आणि आपण जेत्यांच्यावर ११ टक्के ते १०० टक्के टॅरिफ लावत होतो ते आता शून्य टक्के केले असल्यामुळे येत्या वर्षात अमेरीकेतून भारतात प्रचंड शेतमाल येऊन शेतमालाचे भाव भारतात प्रचंडपणे पडतील परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजून दुप्पट तिप्पट होतील.
विदेश दौरे करून उपयोग- शून्य. विनाकारण देशाचा पैसा खर्च करणे आणि काहीही आश्वासने देऊन जनतेचा वेळ वाया घालवणे, जनतेला फसविणे, हेच सध्या सुरू आहे.
जगात सध्याच्या घडीला डोनाल्ड ट्रम्प (अमेरिका), व्लादिमिर पुतीन (रशिया), क्षी जिनपिंग (चीन) आणि नरेंद्र मोदी (भारत) या चार नेत्यांत साम्य दिसून येते. आता यात फरक हाच आहे, की सध्या अमेरिका इतर 'कमकुवत' राष्ट्रांवर दबाव निर्माण करीत आहे, त्यातलाच एक देश आहे भारत. पुतिन सध्या भारताशी मैत्री तोडण्याच्या मार्गावर आहे. चीनने छुप्या पद्धतीने भारतासहित अनेक देशांचे मार्केट काबीज केले आहे, त्यामुळे चीन सध्या शांत आहे. मोदी तर ह्या देशांचे एजंट म्हणून काम करीत असल्याचे दिसते. म्हणूनच ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत प्रामुख्याने विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत. जातीय जनगणना, निवडणूक आयोगाची विश्वासार्हता, ईव्हीएम (EVM), परराष्ट्र धोरण आणि उद्योगपतींशी संबंधित प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत. इतक्यात तर त्यांनी रशियाकडून तेल खरेदी करताना अमेरिकेच्या परवानगीबाबत, तसेच महागाई आणि गॅस तुटवड्याचा मुद्दाही उपस्थित करून सरकारलाधारेवर धरले. तरीही मोदी गप्प आहेत.
रविवार दि. १५ मार्च २०२६ रोजी प्रकाशित झालेला 'युद्ध' केवळ बहाणा आहे, 'लूटमार' हेच लक्ष्य आहे!, हा 'प्रहार' आपण वाचला असेल, तर आपल्या लक्षात येईल, की सरकार जनतेला कसे फसवत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'हडेलहप्पी राजकारणा'चे एका 'इझम' मध्ये (भांडवलशाहीची एक विशिष्ट विचारसरणी) झालेले रूपांतर आज जग अनुभवत आहे. भारतासहित, अमेरिका, रशिया, चीन हे देश मतदारांसमोर स्वतःला प्रजासत्ताक जरी हट्टाने म्हणत असले, तरी लोकशाहीचा मुखवटा लावून हुकूमशाहासारखे राहिले आहेत. बाहेरून निवडणुकांपुरती लोकशाहीः पण आतून संस्थांना खोलवर पोखरत नेणारी एकाधिकारशाही असे प्रारूप निर्माण झाले आहे. ही मंडळी जनतेला किती फसवत आहे, हे यांच्या करणी आणि कथनीतून स्पष्टपणे दिसून येते. आज नरेंद्र मोदी १२ वर्षे सत्ता सत्ता भोगून, तिसऱ्यांदा सत्तेत बसले. त्यांचीही आजन्म सत्तेत राहण्याची इच्छा असल्याचे दिसते. देशातील महत्त्वाचे आणि कधीकाळी संपूर्ण जगात भारताचे वैभव म्हणून ओळखले जाणारे सर्व सरकारी उपक्रम मूठभर भांडवलदारांच्या हाती फुकट किंवा कवडीमोल भावात देऊन देश कसा गुलाम बनवायचा, प्रदीर्घ काळ सत्ता टिकवून ठेवण्यासाठी देशातील सर्व स्वायत्त संस्था कशा दहशतीखाली ठेवायच्या आणि मतदारांना प्रलोभने दाखवून कसे झुलवत ठेवायचेः याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मोदी यांचा सत्ताकाळ आहे. आता भारताने अमेरिकेशी केलेला व्यापारी करार सरळसरळ देश कॉर्पोरेट क्षेत्राच्या, म्हणजेच सध्या जागतिक व्यापार संघटनेवर कंट्रोल असणाऱ्या अमेरिकेच्या घशात घालण्याचा सौदा मोदी सरकारने केला आहे, असे म्हणणे रास्त ठरते.
अशी परिस्थिती जेव्हा येते, की सरकार जनक्षोभापुढे संकटात सापडते, तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने जनतेचे लक्ष भरकटवून टाकण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्या. त्यातल्या त्यात 'धर्म' हा राजकारणाचे हत्यार झाला आहे. जिथे धर्माची अफू पाजली की लोकं त्यातच 'धर्मधुंद' होतात, हे मानसशास्त्र सरकार वापरत आहे. एखादा देश आणि व्यवस्था घडवायला कधीकधी दशके, शतके उलटावी लागतात. माझ्या मते भाजपचे सगळ्यात मोठे अपयश हे आहे, की त्यांनी अतिशय क्षुल्लक कारणांवरून काही चांगल्या गोष्टींची वाट लावून टाकली आहे. हे ट्रम्प महाशय जसे त्यांच्या देशासाठी फायद्याचे आणि इतर देशांसाठी अपायकारक आहेतः पण इथे परिस्थिती अशी आहे, की सध्याचे आपल्या देशाचे सरकार ट्रम्पच्या इशाऱ्यावर चालून आपल्याच देशासाठी अपायकारक ठरत आहे.
मोदी सरकारच्या विविध योजना अयशस्वी ठरत आहेत आणि त्यांचे अपयश कबूल करून त्यात सुधारणा घडवून आणण्याचे कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीयेत. उदा. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जसा FRP दिल्या जातो, त्याप्रमाणे स्वामीनाथन आयोगाने सुचविलेल्या MSP, आणि मी स्वतः सुचविलेल्या SSP म्हणजे 'Strong Suport Price' (मजबूत आधार किंमत) दिली पाहिजे. जी स्वामीनाथन ह्यांनी सुचविल्यानुसार A2 म्हणजे संपूर्ण खर्च + FL म्हणजे शेतकऱ्याच्या फॅमिलीचे लेबर +C2 म्हणजे जमिनीत केलेली गुंतवणूक किंवा मिळणारा वार्षिक ठोका +50% नफा या सूत्रानुसारच ठरविल्या गेली पाहिजे, तरच या सर्वांवर कायमस्वरूपी तोडगा निघेल. दुसरी गोष्ट मोफत शिक्षण आणि आरोग्य सुविधा, याकडे सरकारचे लक्ष नाही. सरकारने जीवनावश्यक वस्तू कायद्यामधून शेतमालाला बाहेर काढावे. या कायद्याद्वारे खाणाऱ्यांच्या जिभेचे चोचले स्वस्तात आणि अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून जवळजवळ फुकटात पुरवले जातातः अगदी महागाई भत्ता आणि ७ व्या वेतन आयोगातून' मिळणारा गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या नोकरशाहीचेसुद्धा. त्यामुळे पिकविणाऱ्याच्या शेतमालाचे बुद्धिपुरस्सर भाव पाडून त्याला गळफास घेण्यास भाग पाडले जात आहे. निर्यात बंदी, आयात खुली, साठाबंदी सारखे हातखंडे वापरणे बंद केले तरी, शेतकऱ्यांवर मोठे उपकार होतील. शेतमालाचे भाव पडण्यामागची खरी आणि महत्त्वाची गोम हीच आहे. आम्ही ते सरकारला वेळोवेळी सुचवितोः मात्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही, या चर्चेसाठी एखादी बैठक घेत नाही, एखादी समिती नेमत नाहीः मग हे सरकार सामान्य जनतेचे आहे, असे कोणत्या आधारावर म्हणायचे?
आता इंधनाचे भाव वाढविण्यासाठी बरोबर वेळ साधला जात आहे. तिकडे युद्धाची परिस्थिती आहे, आणि इकडे पेट्रोल-डिझेल आणि गॅसची कृत्रिम टंचाई उभी करून आता त्याचे भाव वाढविण्याचा मनसुबा दिसून येत आहे. पूर्वी पेट्रोल-डिझेलच्या मुद्यावर काँग्रेसवर तुटून पडणारे भाजपायी आता गॅस पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे, टंचाईचे समर्थन करत आहेत. हे मुळीच स्वीकारार्ह नाही. शिक्षण आणि आरोग्य या अगदी मूलभूत विषयांकडे दुर्लक्ष होत आहे, हे देशाचे मोठे अपयश आहे. याच स्ट्रॅटेजीचा एक भाग म्हणजे, जे पत्रकार 'मुद्यांवर' आवाज उठवत आहेत, त्यांना पेड पत्रकार किंवा काँग्रेसी दलाल ठरवून टाकणे, हा भाजप सरकारचा धंदाच आहे. ट्रम्प यांनाही तेथील पत्रकार अशाच पद्धतीने जेव्हा धारेवर धरत असतात, तेव्हा ट्रम्प महाशय थेट पत्रकारांवर शाब्दिक हल्ला करतात, त्यांच्यावर तुटून पडतातः हे या दोघांमधील साम्य आहे.
गेल्या १० वर्षांमध्ये हिंदू-मुस्लीम, देशभक्त देशद्रोही, भारत-पाकिस्तान... हे वाद-संवाद २४ तास चालवणारे काही न्यूज चॅनल्स भाजप नेत्यांचेच आहेत. यांचा मुख्य उद्देश जनतेचे लक्ष दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या प्रश्नांवरून, मुद्यांवरून हटवून तुम्हाला हिंदू-मुस्लीम, देशभक्त-देशद्रोही, भारत-पाकिस्तान यात अडकवण्याचा आहे.
मी नेहमी म्हणत असतो, की डोनाल्ड ट्रम्प या ऐयाश वृत्तीच्या नेत्यामुळे आणि त्याचे गुलाम बनून इतक्या मोठ्या १४० कोटी लोकसंख्येच्या देशाचा प्रमुख असणाऱ्या मोदी यांच्या या धोरणामुळे धोरणामुळे संपूर्ण संपूर्ण देशाचा देशाचा सत्यानाश होऊ घातला आहे. ही सत्ता उलथवून टाकण्यासाठी आता देशाचा प्रत्येक नागरिक पुढे आला पाहिजे.
प्रतिक्रिया देण्यासाठी थेट प्रकाश पोहरेंना संपर्क करा किंवा आपल्या प्रतिक्रिया 2prakashpohare@gmail.com याइ-मेल किंवा ९८२२५९३९२१ या व्हॉट्सअप वर पाठवा. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहायला विसरू नका.
प्रहार
प्रकाश पोहरे
मो. नं.: +९१-९८२२५९३९२१