Breaking News
  • आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घोड्यावर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला
  • धक्कादायक! बुलढाण्यात सिलेंडरचा स्फोट झाल्यानं घराला भीषण आग, 85 वर्षीय वृद्धेचा मृत्यू
  • भिवंडीत तरुणाचा साप गळ्यात घालून स्टंट; व्हिडिओ व्हायरल
  • भाजपचे शहराध्यक्ष नितीन धांडे आमदार व्हावे यासाठी साकडे घालणार- नवनीत राणा
  • नागपूरच्या धरमपेठ परिसरात मध्यरात्री वादातून 20 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याची चाकूने हत्या करण्यात आली. आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
  • पेपर लीकनंतर सरकारने NEET परीक्षा रद्द केली!
  • NEET UG 2026 परीक्षा रद्द; प्रकरणाची चौकशी CBI कडून होणार
  • आता नेपाळ जाण्यासाठी 'विशेष ओळखपत्र' दाखवणे अनिवार्य
  • रोहित आणि कोहली MS धोनीच्या खास क्लबमध्ये दाखल!

होम > संपादकीय > लेख

राजे जिवंत असते तर..


राजे जिवंत असते तर

'सगळं विचित्र वातावरन झालं भाऊ आजकाल..जो उठते तो भलकाई बोलते.'
'म्हनजे काय झालं?'
'एवढा मोठा शिवाजी राजा.. आपून ज्या मानसाले दैवत मानतो.. त्या छत्रपतीबद्दल काही भामटे तोंडात येईन ते बकतात.'
'म्हनजे त्या बागेसोरबद्दल बोलून राह्यला काय तू?'
'तो बाग्या म्हने शिवाजी महाराज युद्ध करून थकले अन्äा् रामदास स्वामीच्या पायावर पडले.. हा राजपाट तुम्ही सांभाळा बोलले.'
'तो बाग्या काही इतिहास तज्ज्ञ आहे काय? मांगून आलं अन् शायनं झालं.'
'दुसरा तो भगव्या कपड्यातला टकल्या स्वामी भादरला.. तो म्हने, पेशवे युद्ध लढले अन् नाव शिवाजीचं झालं.. शिवाजीनं कधीच मैदानात युद्ध केलं नाही.. सांगा.. असं बोलल्यावर मस्तकात जात नाही काय मानसाची?'
'पुरी मस्तकात जाते. राजाचा सच्चा मावळा हे कधीच सहन करत नाही.'
'राजाच्या राज्यभिषेकाले विरोध करनारे हेच व्हयत ते टकले.. त्यासाठी काशीचा गागाभट्ट आना लागला.'
'मी म्हनतो ज्याले हे गुरू म्हणून मिरोतात, तो राज्यभिषेकाच्या टाईमले पायन्यात झोपला होता काय?'
'आज राजे जिवंत असते, तर अशा लोकाईचं काय केलं असतं?’ 
'डायरेक हिरकनी बुरुजावरुन कडेलोट केला असता.. खरात बाबाचे हातपाय कलम केले असते.. एक घाव दोन तुकडे.. दहा-दहा वर्ष कोर्टात केस चालली नसती.'
'मी म्हनतो ज्यानं इतिहास वाचला नाही त्यानं भलकाई बोलू नये.'
'अरे हे टकले आपली टेस्ट घेतात..राजावर बोललं की मावळे किती भडकतात हे पाह्यतात. मधात पिल्लू सोडू शिकल्या सवरल्या पोराईले फेसबुकवर गुतून देतात.. तुम्ही करा भांडन.. काढा मोर्चे.. व्हा अंदर.. तुम लढो हम कपडे संभालते.'
'आता बरोबर बोलले तुम्ही.. कट्टर राजकारनी लोकाईची अशा साधूले साथ असते.'
'हे कायचे साधू बे? पोथीतल्या गोष्टी पाठ करून रामकथा सांगतली म्हनजे कोनी साधू होत असते काय? संत कीर्तन प्रवचनाचे लाखो रुपये घेत असते काय? तुकोबा सांगत, जिथं कीर्तन करसान तिथला चाराही आपल्या बैलाले टाकू नका.. हे भामटे तसं करतात काय?’

नरेंद्र इंगळे
९५६१२२६५७२

Related to this topic: