Breaking News
  • आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घोड्यावर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला
  • धक्कादायक! बुलढाण्यात सिलेंडरचा स्फोट झाल्यानं घराला भीषण आग, 85 वर्षीय वृद्धेचा मृत्यू
  • भिवंडीत तरुणाचा साप गळ्यात घालून स्टंट; व्हिडिओ व्हायरल
  • भाजपचे शहराध्यक्ष नितीन धांडे आमदार व्हावे यासाठी साकडे घालणार- नवनीत राणा
  • नागपूरच्या धरमपेठ परिसरात मध्यरात्री वादातून 20 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याची चाकूने हत्या करण्यात आली. आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
  • पेपर लीकनंतर सरकारने NEET परीक्षा रद्द केली!
  • NEET UG 2026 परीक्षा रद्द; प्रकरणाची चौकशी CBI कडून होणार
  • आता नेपाळ जाण्यासाठी 'विशेष ओळखपत्र' दाखवणे अनिवार्य
  • रोहित आणि कोहली MS धोनीच्या खास क्लबमध्ये दाखल!

होम > संपादकीय > लेख

बारावीचा निकाल आणि नीट परीक्षा: लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम!


बारावीचा निकाल आणि नीट परीक्षा लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम

शिक्षण व्यवस्थेतील निर्णय हे केवळ कॅलेंडरनुसार नसतात, ते लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी जोडलेले असतात. म्हणूनच परीक्षा, निकाल, प्रवेश प्रक्रिया व स्पर्धा परीक्षा यांचे वेळापत्रक ठरवताना संवेदनशीलता, दूरदृष्टी व समन्वय आवश्यक असतो; मात्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नीट परीक्षेच्या आदल्या दिवशी बारावीचा निकाल जाहीर केल्याने पुन्हा एकदा प्रशासनिक नियोजनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
आजच्या काळात बारावीची परीक्षा ही अंतिम टप्पा नाही, तर स्पर्धात्मक प्रवासाची सुरुवात आहे. डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी र्‍EEऊ(राष्ट्रीय पात्रता तसेच प्रवेश परीक्षा) ही निर्णायक परीक्षा आहे. लाखो विद्यार्थी वर्षभर दिवस-रात्र अभ्यास करून या परीक्षेसाठी मेहनत घेतात. अशा परिस्थितीत निकालाच्या भावनिक तणावात विद्यार्थ्यांना ढकलणे योग्य म्हणता येणार नाही. यामुळे संपूर्ण राज्यात पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नीट परीक्षा म्हणजे केवळ परीक्षा नाही, तर देशातील सर्वात मोठ्या स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक आहे. यंदा २०२६ साठी सुमारे २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती विविध अहवालांतून समोर आली आहे. २०२५ मध्येही २२.७ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षेसाठी नोंदणीकृत होते, याचा अर्थ असा की, देशभरातील लाखो विद्यार्थी एकाच दिवशी आपल्या भवितव्यासाठी परीक्षा देत आहेत. श्ँँए, ँDए, Aभ्ळएप्/ँAश्ए न्नूीग्हarब् आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्र राज्य मंडळाच्या २०२६ च्या बारावी परीक्षेसाठी १४,४४,७१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, तर १४,३३,०५८ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी १२,८६,८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्याचा निकाल ८९.७९ टक्के लागला. म्हणजेच महाराष्ट्रातच सुमारे साडेचौदा लाख विद्यार्थी निकालाची वाट पाहत होते. यातील मोठा वर्ग हा नीट, जेईई, सीईटी यांसारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करणारा आहे.
रविवारी देशभरात २२ लाख ७९ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. उपलब्ध आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये महाराष्ट्रातून सुमारे १.२५ लाखांहून अधिक विद्यार्थी पात्र ठरले, म्हणजे परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या त्यापेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट होते. महाराष्ट्र हा देशातील नीट स्पर्धेत आघाडीच्या राज्यांपैकी एक आहे. यामुळेच या परीक्षेचा विद्यार्थ्यांवर व विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांवर काय परिणाम करू शकतो, याचा अंदाज आपल्याला बांधता येईल. 
बारावीचा निकाल हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी भावनिक विषय असतो. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले, टक्केवारी कमी आली, नापास झाल्याची भीती वाटली, पालकांचा दबाव वाढला, तर विद्यार्थ्याचा आत्मविश्वास डळमळतो. अशा अवस्थेत दुसर्‍याच दिवशी तीन तासांची देशव्यापी स्पर्धा परीक्षा देणे किती कठीण असेल, याची कल्पना सहज करता येते. ज्यांना चांगले गुण मिळाले त्यांचा आनंद असतो; पण ज्यांना अपेक्षित निकाल मिळाला नाही, त्यांची रात्र बेचैन होते. नीटसारख्या परीक्षेत मनःशांती, एकाग्रता व आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा असतो. तोच निकालामुळे डळमळीत होण्याचा धोका निर्माण झाला. अलीकडे तर एक एक मार्कासाठी स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे ८५. ९०टक्के मिळाले तरीही समाधान होत नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचा टक्का जर घसरला तर त्याच्या दुसर्‍या दिवशी होणार्‍या परीक्षेत त्याच्यावर काय परिणाम होईल हे संबंधितांनी लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. किंबहुना, या यंत्रणेमध्ये काम करणार्‍यांना काही भावना आहेत की नाही? असा संतप्त प्रश्न आज विचारला जात आहे.
नीट परीक्षा संपल्यानंतर दुसर्‍या दिवशी किंवा दोन दिवसांनी बारावीचा निकाल जाहीर केला असता, तर कोणतीही अडचण निर्माण झाली नसती. प्रवेश प्रक्रिया उशिरा झाली नसती. उलट विद्यार्थ्यांना परीक्षा शांत मनाने देता आली असती. प्रश्न निकाल लवकर लावण्याचा नाही; प्रश्न योग्य वेळी लावण्याचा आहे. विद्यार्थी हा केवळ सीट नंबर नसतो. तो कुटुंबाची आशा, मेहनतीचा प्रवास व भविष्यातील स्वप्न असतो. म्हणूनच अशा निर्णयांत मानवी बाजू महत्त्वाची आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी संबंधित दोन महत्त्वाच्या घटना एकमेकांवर आदळतील, असे वेळापत्रक ठरवणे ही प्रशासकीय चूकच म्हणावी लागेल.
वेळापत्रक कागदावर बनते; पण त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर होतो, या दृष्टीने विचार करून, निकाल काही तास उशिरा लागला असता, तर फारसा फरक पडला नसता; पण एखाद्या विद्यार्थ्याची नीट परीक्षा बिघडली, तर त्याचे एक वर्ष, कदाचित करिअरच प्रभावित होऊ शकते. नीट परीक्षेच्या निकालानंतर या बाबीचे परिणाम समोर येतीलच. म्हणून आता तरी शिक्षण मंडळे, परीक्षा संस्था व शासनाने समन्वय साधून, विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणार्‍या या आजच्या गोंधळावरून धडा घेण्याची नितांत गरज आहे.

मनोज बारी 
आवृत्ती संपादक, जळगाव खान्देश
९८२२५ ९३९३८
manojbari23@gmail.com

Related to this topic: