Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > संपादकीय > अग्रलेख

निष्ठेचे फळ....!


निष्ठेचे फळ

काही वर्षांपूर्वी केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून भाजपने कर्नाटकातील ताकदवर काँग्रेस नेते डी.के.शिवकुमार यांना आपल्या कळपात खेचण्याचा प्रयत्न केला होता. अन्य राज्यांमध्ये भाजपचा हा प्रयोग यशस्वी झाला असला तरी शिवकुमार यांनी मात्र भाजपच्या धमकीला भीक घातली नाही. ते आपल्या पक्षासोबत एकनिष्ठ राहिले. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे, अजित पवार, नारायण राणे, अशोक चव्हाण असे कितीतरी दिग्गज नेते केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा चुकविण्यासाठी भाजपला अक्षरश: शरण गेले. परंतु डी. के. शिवकुमार यांनी भाजपला शरण जाण्याऐवजी तुरुंगात जाणे पसंत केले. त्यांनी काँग्रेसप्रती ठेवलेली निष्ठा शेवटी फळाला आली. डी. के. शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा अखेरीस पूर्ण होत आहे. शिवकुमार यांचा राजकीय प्रवास तसाही थक्क करणारा आहे. १९८५ मध्ये माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या विरोधात लढत देऊन ते प्रकाशझोतात आले होते. त्या निवडणुकीत ते पराभूत झाले असले तरी पुढच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांनी यश प्राप्त केले. १९८९ पासून सतत आठ वेळा विधानसभेची निवडणूक जिंकलेले शिवकुमार काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात. तत्कालीन मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांनी शिवकुमार यांच्यातील गुण हेरून त्यांना राजकीय ताकद दिली. २००२ मध्ये महाराष्ट्रात विलासराव देशमुख यांचे सरकार संकटात आले असता काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांना बंगळुरू सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. तेव्हा शिवकुमार आणि रोशन बेग या दोन तत्कालीन मंत्र्यांनी आमदारांची सारी खबरदारी घेतली होती. अहमद पटेल यांच्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळी गुजरातमधील काँग्रेस आमदारांना सुरक्षितस्थळी हलविण्यात शिवकुमारच आघाडीवर होते. केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर काँग्रेसमधील बड्या नेत्यांच्या विरोधात फास आवळला गेला. त्यात शिवकुमार हे सुद्धा होते. भाजपमध्ये प्रवेश केल्यास कारवाई टाळण्याचा आलेला निरोप त्यांना धुडकावून लावला. ईडीने शिवकुमार यांना अटक करून दिल्लीच्या तिहार तुरुंगात डांबले होते. ५० दिवसांच्या तुरुंगवारीनंतर त्यांना जामीन मंजूर झाला. तेव्हापासून काँग्रेसमध्ये त्यांचे महत्त्व वाढले. पक्षातील लढवय्या नेता अशी त्यांची प्रतिमा तयार झाली.

Related to this topic: