Breaking News
  • आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घोड्यावर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला
  • धक्कादायक! बुलढाण्यात सिलेंडरचा स्फोट झाल्यानं घराला भीषण आग, 85 वर्षीय वृद्धेचा मृत्यू
  • भिवंडीत तरुणाचा साप गळ्यात घालून स्टंट; व्हिडिओ व्हायरल
  • भाजपचे शहराध्यक्ष नितीन धांडे आमदार व्हावे यासाठी साकडे घालणार- नवनीत राणा
  • नागपूरच्या धरमपेठ परिसरात मध्यरात्री वादातून 20 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याची चाकूने हत्या करण्यात आली. आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
  • पेपर लीकनंतर सरकारने NEET परीक्षा रद्द केली!
  • NEET UG 2026 परीक्षा रद्द; प्रकरणाची चौकशी CBI कडून होणार
  • आता नेपाळ जाण्यासाठी 'विशेष ओळखपत्र' दाखवणे अनिवार्य
  • रोहित आणि कोहली MS धोनीच्या खास क्लबमध्ये दाखल!

होम > संपादकीय > अग्रलेख

अपेक्षित विक्रम...!


अपेक्षित विक्रम

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसोबतच महाराष्ट्रातील दोन मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडली. अर्थात दोन्ही मतदारसंघात निकाल काय येणार हे सर्वविदितच होते आणि अपेक्षेप्रमाणे दोन्ही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आले. बारामतीत अजितदादांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत सुनेत्राताईंनी उभे राहण्याचा निर्णय घेतला त्याचवेळी ही निवडणूक अगदीच एकतर्फी होईल, हे स्पष्ट झाले होते. त्यातच राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी या ठिकाणी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. स्वत: शरद पवारांनी पत्रक काढून बारामतीच्या मतदारांना सुनेत्राताईंना विजयी करण्याचे आवाहन केले. काँग्रेसने सुरुवातीला उमेदवार देण्याचे ठरविले; परंतु शेवटच्या क्षणी काँग्रेसनेही माघार घेतली. उर्वरित अपक्ष उमेदवारांपैकी कुणीही आव्हान देण्याच्या स्थितीत नव्हता. त्यामुळे उत्सुकता केवळ मताधिक्क्याची आणि अपेक्षित विक्रमाची होती. तो अपेक्षित विक्रम सुनेत्राताईंनी प्रस्थापित केला. विधानसभा निवडणुकीत संपूर्ण देशात सर्वाधिक म्हणजे दोन लाख १८ हजार ३४ इतक्या प्रचंड मताधिक्क्याने विजयी होण्याचा विक्रम आता सुनेत्राताईंच्या नावे झाला आहे. राहुरीच्या पोटनिवडणुकीतही विजयाची औपचारिकता तेवढी बाकी होती. अर्थात राहुरीमध्ये शरद पवार गटाने आपला उमेदवार दिला होता. संभाव्य उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी ऐनवेळी माघार घेतल्यानंतर शरद पवार गटाने गोविंद मोकाटे यांना मैदानात उतरविले. शरद पवार गटाने मोकाटेंना उमेदवारी तर दिली; परंतु खासदार नीलेश लंके व्यतिरिक्त अन्य कुणीही बडा नेता त्यांच्या प्रचाराला फिरकला नाही. सुनेत्राताईंसाठी पत्रक काढणार्‍या शरद पवारांनी राहुरीच्या मतदारांना मोकाटे यांना विजयी करण्याचे साधे आवाहनही केले नाही. परिणामी ही लढतही एकतर्फी झाली. गोविंद मोकाटेंसह उर्वरित सगळ्याच उमेदवारांची जमानत जप्त झाली. 

Related to this topic: