Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > संपादकीय > लेख

आकलन

संघ: बाह्य जगात नोंदणी, भारतात का नाही ?

बाह्य जगात किमान ४५ देशांत संघविचाराने प्रेरित संघटना उभ्या झाल्या आहेत; मात्र त्या संघटनांनी RSS ऐवजी “हिंदू स्वयंसेवक संघटना” (एचएसएस- HSS)असे नाव धारण केले आहे.


संघ बाह्य जगात नोंदणी भारतात का नाही

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परदेशातील विस्ताराबरोबरच त्याच्याशी संबंधित हिंदू स्वयंसेवक संघटनांच्या कायदेशीर नोंदणीचा मुद्दाही चर्चेत आहे. अमेरिका, कॅनडा, ब्रिटनसह अनेक देशांत या संस्था स्थानिक कायद्यानुसार नोंदणीकृत आहेत; मात्र भारतात मूळ संघटनेची अधिकृत नोंदणी का नाही, हा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे.

प्रस्तुत स्तंभलेख प्रकाशित होईल‌ त्या दिवशी राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे (RSS) विद्यमान सर्वेसर्वा डॉ. मोहन भागवत यूके, कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर असतील. बाह्य जगात संघाविरुद्ध आवाज उठतो आहे. त्यास उत्तर देण्यासाठी भागवतांचा हा दौरा आहे. 
दौरा होत असलेल्या देशातील स्थानिक संघटनांनी या दौऱ्यांचे आयोजन केले आहे, असे RSS कडून सांगितले जात आहे. त्यावर आक्षेप असण्याचे कोणतेही कारण नाही. 
RSSचे जगातील जाळे वाचकांपुढे मांडणे, हा या लेखाचा हेतू आहे.  हिंदूहितरक्षक असलेल्या संघाचा (RSS)  सरकारदरबारी  कायदेशीर नोंदणीचा मुद्दा भारतात गाजत आहे. बाह्य जगात, संबंधित देशातील कायद्यानुसार संघ प्रणित आणि प्रभावित संघटनांची नोंदणी झालेली आहे. मूळ स्थानी, उगमस्थानी, भारतात RSSची नोंदणी का नाही? या सार्वजनीक  प्रश्नाने भक्त अस्वस्थ झाले आहेत. आम्हीदेखील हाच  प्रश्न विचारत आहोत. आमचा नाइलाज आहे.
जगभर पसरलेला संघ:
बाह्य जगात किमान ४५ देशांत संघविचाराने प्रेरित संघटना उभ्या झाल्या आहेत; मात्र त्या संघटनांनी RSS ऐवजी “हिंदू स्वयंसेवक संघटना” (एचएसएस- HSS)असे नाव धारण केले आहे. संबंधित देशातील कायद्यानुसार त्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे. 
एचएसएस  १५६ देशांत आहे, असा  दावा केला जात असला तरी उपलब्ध अधिकृत/सरकारी स्रोतांमध्ये सुमारे ४०-४५ देश असा आकडा प्रामुख्याने आढळतो. 
कॅनडाच्या Immigration and Refugee Board नुसार २०२४ मध्ये सुमारे ४० देशांत एचएसएस कार्यरत होती. ‌अन्य सूत्रानुसार,  २०२४ साली ४५ देश आणि ७५० शाखा, असा  एचएसएस कॅनडाचा पसारा होता.
देशनिहाय नोंद:
एचएसएस केनिया: आफ्रिकेतील केनियात,  राजधानी नैरोबी येथे १४ जानेवारी १९४७ रोजी एचएसएस स्थापन. ही जगातील पहिली हिंदू स्वयंसेवक संघटना (HSS)  असल्याचे सांगितले जाते.
एचएसएस नेपाळ: १९९२ मध्ये स्थापना (संदर्भ: सेंटर फार साऊथ एशियन स्टडीज). 
सुरीनाम: HSS Suriname  १९९८ पासून आणि 
मॉरिशस: HSS Mauritius  २००० सालापासून कार्यरत. 
(संदर्भ :  Global Directory of Dharma Organisations‌) 
जगभरातील व्याप्ती:
तांझानिया, युगांडा, दक्षिण आफ्रिका, नार्वे, डेन्मार्क,  फिनलंड, फ्रान्स, इटली, नेदरलॅंड, फ्रान्स, पोलंड, स्वीडन, जपान, हाँगकाँग, त्रिनिनाद आणि टोबागो या देशांत/प्रदेशांत एचएसएस किंवा तिच्याशी संबंधित शाखांचा उल्लेख आढळतो.
डेन्मार्क, जर्मनी, फिनलॅंड, फ्रान्स,   इटली, नेदरलॅंड, पोलंड, जपान,  स्वीडन आणि नार्वे या देशांत एचएसएस‌ वाढविण्याची ‌राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची  (RSS)योजना असल्याचे सांगितले गेले.
सरकारदरबारी नोंदणी-
एचएसएस न्यूझीलंड:
१९९६पासून कार्यरत. पहिली शाखा हॅमिल्टन येथे. सरकारी नोंदणी- NZ Incorporated Charity No. CC56274.
जर्मनी: HSS Germany या नावाने स्वतंत्र संस्था कार्यरत.
सरकारी नोंदणी क्रमांक VR 207045.
एचएसएस ऑस्ट्रेलिया: 
९ डिसेंबर २०१० पासून कार्यरत.
नोंदणी क्रमांक ABN 84-...ACN 600150365.
डॉ. भागवत यांच्या दौऱ्यातील तीन देश:
सरसंघचालक डॉ. भागवत यांच्या दौऱ्यातील तीन देशांतील एचएस एस संघटनांची माहिती खालीलप्रमाणे आहे- 
एचएसएस यू के- इंग्लंड, वेल्स, स्काटलॅंड आणि उत्तर आयर्लंडचा समावेश असलेला देश म्हणजे युनायटेड किंग्डम (यू के). या देशात लंडन येथे  २ जुलै १९६६ रोजी हिंदू स्वयंसेवक संघाची (HSS U K) स्थापना झाली. २९ एप्रिल १९७४ रोजी या संघटनेची ट्रस्ट म्हणून चॅरिटी कमिशनकडे नोंदणी झाली. नोंदणी क्रमांक- २६७३०९. 
“हिंदू धर्माचा प्रसार, हिंदू आदर्श व जीवन पद्धतीचे शिक्षण, शाखा, शारीरिक- मानसिक प्रशिक्षण, निवासी शिबीर आणि व्याख्याने” अशी संघटनेची उद्दिष्टे सरकारी नोंदणीवेळी नमूद करण्यात आली.
पुढे  ५एप्रिल २०२३ रोजी  नव्याने HSS U Kची चॅरिटी कमिशनकडे  नोंदणी केल्या गेली (नोंदणी क्र.१२०२६३५, सी आय ओ).
नोंदणीवेळी नमूद केलेले उद्दिष्ट पुढीलप्रमाणे आहे- 
“हिंदू श्रद्धा, हिंदू धर्म, हिंदू धर्म शिक्षण आणि हिंदू संस्कृती/ वारसा पुढे नेणे!”
या संघटनेचे २०२४-२५ मधील उत्पन्न ५ लक्ष १४ हजार पौंड एवढे होते.
एचएसएस अमेरिका: १९८९ साली न्यू जर्सी येथे स्थापना. ७ फेब्रुवारी १९८९ रोजी मेरीलॅंड येथे पहिली शाखा प्रारंभ.
“ना नफा” तत्त्वावर आधारित ही संघटना करमुक्त आहे. १९८९ साली  स्वतंत्र संस्था म्हणून कायदेशीर नोंदणी. या संस्थेच्या २०२४-२५ अहवालानुसार, अमेरिकेत ३३ राज्ये आणि १८६ शहरांत २६७ शाखा आहेत.‌
HSS USA ला संस्थात्मक अनुदानही मिळतात. २०२४  साली अकरा दात्यांकडून एक लाखावर डॉलर्स मिळाले. देणगीदारात JPMorgan Chase Foundation आणि Pfizer Foundation यांचा समावेश आहे.
एचएसएस कॅनडा: या देशात स्वतंत्र HSS संस्था १९७३ च्या दरम्यान स्थापन झाली. तिच्या अधिकृत संकेतस्थळानुसार ती स्वयंसेवी, ना-नफा, सामाजिक व सांस्कृतिक संस्था आहे. हिंदू समाजाचे संघटन, हिंदू मूल्यांचे जतन आणि सेवा हे तिचे उद्दिष्ट आहे. तिच्या २५ पेक्षा अधिक साप्ताहिक शाखा (शाखा/शाखा-केंद्रे) आहेत. 
२०२२ साली  तिचे उत्पन्न अंदाजे दीड लाख (कॅनेडियन) डॉलर आणि संपत्ती सव्वा तीन लाखांवर होती.
आमचे आकलन स्पष्ट आहे.
एचएसएस हे RSSशी वैचारिक आणि संघटनात्मक संबंध असलेले परदेशातील नेटवर्क आहे. वरील विस्तृत माहिती लक्षात घेतल्यास, विविध देशांमध्ये एचएसएसच्या संस्था स्थानिक कायद्यानुसार ना नफा तत्त्वावर धर्मादाय किंवा कायदेशीररीत्या नोंदणीकृत स्वतंत्र संघटना म्हणून नोंदलेल्या आहेत. सरकारकडे नोंद असल्याने आर्थिकसह संपूर्ण व्यवहारही पारदर्शी होतात‌.‌ भारतात  संघाच्या आर्थिक आणि इतरही व्यवहारात पारदर्शकता किती? गुरूदक्षिणेचा हिशेब नाहीच. संघटनेची नोंदणी नसल्याने तिला कायदे पाळण्याचीही सक्ती नाही!! 
अधिकृत नोंदणीसाठी आरएसएसकडून नकार मिळण्याची आणखी कोणती कारणे असू शकतात ? प्रश्न कायम आहेच!

 प्रभाकर कोंडबत्तुनवार
 मो.  ९४०५७५०४६०
(लेखक प्रसिद्ध पत्रकार आणि 
ज्येष्ठ संपादक आहेत.)

Related to this topic: