अजितदादा पवारांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घोषित झाली तेव्हा या मतदारसंघातून सुनेत्राताई पवार यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्या सध्या उपमुख्यमंत्री आहेत; परंतु विधिमंडळाच्या सदस्या नाहीत. त्यामुळे त्यांना पदग्रहण केल्यानंतर सहा महिन्यांच्या आत कोणत्या तरी सभागृहाचे सदस्य होणे अनिवार्य आहे. त्यासाठीच त्यांनी बारामतीतून लढण्याचे ठरविले. सुनेत्राताईंनी निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने यापूर्वी या मतदारसंघातून निवडणूक लढविलेल्या शरद पवार गटाने निवडणूक न लढविण्याचे घोषित केले. सुनेत्रताईंना बिनविरोध निवडून द्यावे, असे आवाहनही सुप्रिया सुळेंनी केले होते. इतर पक्षांची या मतदारसंघात फारशी ताकद नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होईल असेच वाटत होते; परंतु मविआतील अन्य एक घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने शरद पवार गटाची विनंती धुडकावून लावल्याचे दिसते. या मतदारसंघात फारशी ताकद नसतानाही काँग्रेसने बारामतीत आपला उमेदवार उभा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. बारामतीसोबतच राहुरीचीही निवडणूक होत आहे. राहुरीत भाजपने दिवंगत आमदार कर्डिले यांच्या सुपुत्राला उमेदवारी दिली आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी देखील या दोन्ही मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती; परंतु काँग्रेसने मात्र या दोन्ही मतदारसंघात उमेदवार उतरविण्याची तयारी केली आहे. निवडणूक लढविण्याच्या राज्य काँग्रेसच्या निर्णयाला पक्षश्रेष्ठींकडूनही हिरवा कंदील मिळाल्यामुळे या दोन्ही मतदारसंघात निवडणूक होणे निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे आपले उमेदवार घोषित करण्यापूर्वी काँग्रेस आपल्या मित्रपक्षांसोबत चर्चा करणार आहे. त्यामुळे बारामतीत काँग्रेसचा उमेदवार हा महाविकास आघाडीचा असेल की केवळ काँग्रेसचा हा संभ्रम निर्माण झाला आहे. दोन्ही मतदारसंघात निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे मात्र निश्चित झाले आहे.
सुनेत्राताई पवार व काँग्रेसमधील स्पर्धा उघड
बारामती व राहुरी मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार उतरविण्याची तयारी केली आहे, तर सुनेत्राताई पवार यांना बिनविरोध निवडून देण्याची अपेक्षा होती.
संबंधित सामग्री
उमाळी गावात रक्ताच्या नात्याला काळिमा! मुलाकडून वडिलांचा कोयत्याने वार करून खून; मलकापूर तालुक्यात खळबळ
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील उमाळी येथे १९ वर्षीय मुलाने ५० वर्षीय वडिलांवर कोयत्याने वार केल्याची प्राथमिक माहिती आहे.
दिल्लीतील ‘लहरा दो तिरंगा’ रॅलीपूर्वी CJP संस्थापक अभिजीत दीपके यांना घरातून ताब्यात घेतले
दिल्लीतील ‘लहरा दो तिरंगा’ रॅलीपूर्वी CJP संस्थापक अभिजीत दीपके यांना ताब्यात घेतले. आठवडाभरातील ही दुसरी कारवाई आहे.
उद्धव ठाकरेंच्या गटाला आणखी एक धक्का? आनंद दुबे शिंदे गटात दाखल
आनंद दुबे यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. ठाकरे गट सोडण्यामागील कारणे, हिंदुत्वावरील मतभेद आणि राहुल गांधींवरील शिंदेंची टीका जाणून घ्या.
शेवगावात हजारो झाडांची कत्तल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्न
शेवगावमध्ये अवैध वृक्षतोडीचा आरोप; वाघोली ग्रामपंचायतीचा इशारा, तर वनविभागाच्या भूमिकेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित.
अकोल्यात भीषण पाणीटंचाईचे संकट! महान धरणातील जलसाठा घटला; पाण्याचा अपव्यय केल्यास नळजोडणी खंडित होणार
अकोला जिल्ह्यात २० वर्षांनंतर पुन्हा पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. महान धरणातील जलसाठा घटल्याने पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर महापालिका कारवाई करणार आहे.