Suraj Chavan Baby

‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता सूरज चव्हाण बाबा झाला; जन्माष्टमीला घरी कन्यारत्न

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता सूरज चव्हाण याच्या आयुष्यात आनंदाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.

‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता सूरज चव्हाण बाबा झाला; जन्माष्टमीला घरी कन्यारत्न

Suraj Chavan Baby

सूरज-संजनाच्या आयुष्यात चिमुकल्या लेकीचे आगमन; हॉस्पिटलमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता सूरज चव्हाण याच्या आयुष्यात आनंदाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. ४ सप्टेंबर २०२६ रोजी कृष्ण जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर सूरज आणि संजना आई-बाबा झाले आहेत. संजनाने गोंडस मुलीला जन्म दिला असून, त्यांच्या घरी चिमुकल्या लेकीचे आगमन झाले आहे. ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमधून समोर आली असून, चाहत्यांकडून सूरज-संजनावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सूरज चव्हाण बाबा होणार असल्याची माहिती त्याची मानलेली बहीण आणि मराठमोळी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने यापूर्वी दिली होती. जान्हवीने संजनाची चोरओटी भरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये संजना आपल्या घरी राधेचे आगमन होणार असल्याचा आनंद व्यक्त करताना दिसली होती.

आता संजनाची डिलिव्हरी झाल्यानंतर हॉस्पिटलमधील आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मुलगी झाल्याचा आनंद सूरज आणि संजनाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे पाहायला मिळतो. सूरज पत्नी संजनाला प्रेमाने जवळ घेत तिच्या तब्येतीची विचारपूस करताना दिसत आहे. यावेळी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या नातेवाईकांचीही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.


सूरज आणि संजना आई-बाबा झाल्याची माहिती समोर येताच त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर कमेंट्स आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. चाहत्यांकडून दोघांनाही त्यांच्या आयुष्यातील या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

दरम्यान, सूरज आणि संजना आपल्या लेकीचे नाव काय ठेवणार, याची उत्सुकता आता त्यांच्या चाहत्यांसह प्रेक्षकांनाही लागली आहे. सूरज चव्हाण आणि संजना यांचा विवाह २९ नोव्हेंबर २०२५ रोजी बारामतीत शाही पद्धतीने पार पडला होता. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून सूरजची ओळख आहे. ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये सहभागी झाल्यानंतर त्याला मोठी लोकप्रियता मिळाली.

संबंधित सामग्री

नाना पाटेकरांच्या निधनाने मुख्यमंत्री फडणवीस भावूक; म्हणाले, ‘भाऊ आणि मार्गदर्शक गमावला’

नाना पाटेकरांच्या निधनाने मुख्यमंत्री फडणवीस भावूक; म्हणाले, ‘भाऊ आणि मार्गदर्शक गमावला’

नाना पाटेकरांच्या निधनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक झाले. ‘भाऊ आणि मार्गदर्शक गमावला’, अशी भावना व्यक्त करत त्यांनी नानांच्या सामाजिक कार्याला उजाळा दिला.

Oct 08, 2026
 नाना पाटेकर यांच्या निधनाने सयाजी शिंदेंना मोठा धक्का; म्हणाले, ‘कालपर्यंत छान बोलत होतो’

नाना पाटेकर यांच्या निधनाने सयाजी शिंदेंना मोठा धक्का; म्हणाले, ‘कालपर्यंत छान बोलत होतो’

नाना पाटेकरांच्या निधनाने सयाजी शिंदे भावूक झाले. ‘कालपर्यंत खूप छान बोलत होते आणि अचानक असं घडलं,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Oct 08, 2026
नाना पाटेकरांचं पार्थिव गोव्यात; अंत्यसंस्कार कुठे होणार? थेट या गावी होणार अंतिम विधी

नाना पाटेकरांचं पार्थिव गोव्यात; अंत्यसंस्कार कुठे होणार? थेट या गावी होणार अंतिम विधी

नाना पाटेकर यांचे वयाच्या 75व्या वर्षी गोव्यात निधन झाले. 45 मिनिटे CPR देऊनही त्यांना वाचवता आले नाही. पुण्यातील डोणजे येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

Oct 08, 2026
अभिनयाचा ‘नटसम्राट’ हरपला; नाना पाटेकर यांचे ७५व्या वर्षी निधन

अभिनयाचा ‘नटसम्राट’ हरपला; नाना पाटेकर यांचे ७५व्या वर्षी निधन

रंगभूमीपासून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंत आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यात निधन झाले.

Oct 08, 2026
डीजे बंदीवर श्रेयस तळपदे स्पष्टच बोलले; ‘सण साजरा करा, पण लोकांना त्रास होता कामा नये’

डीजे बंदीवर श्रेयस तळपदे स्पष्टच बोलले; ‘सण साजरा करा, पण लोकांना त्रास होता कामा नये’

गणेशोत्सवातील डीजेच्या मुद्द्यावर श्रेयस तळपदे यांनी सण साजरे करताना नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. मराठी भाषा आणि ‘हनुमान अंश’वरही त्यांनी भाष्य केले.

Sep 09, 2026