Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > मनोरंजन

संपदा गाडेकर विजेता

Vidarbha Talent Award: विदर्भ टॅलेंट अवॉर्डने गायिका कु. संपदा गाडेकर सन्मानित

संपदा गाडेकर ने विदर्भ सिंगिंग स्पर्धा में उत्कृष्ट प्रदर्शन कर विदर्भ टॅलेंट अवॉर्ड जीता, निशिगंधा वाड ने पुरस्कार प्रदान किया।


vidarbha talent award विदर्भ टॅलेंट अवॉर्डने गायिका कु संपदा गाडेकर सन्मानित

बुलढाणा (Vidarbha Talent Award) : येथे आयोजित विदर्भस्तरीय सिंगिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद मिळविणाऱ्या कु. संपदा वसंतराव गाडेकर (Singer Sampada Gadekar) हिला सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री निशिगंधा वाड (Actress Nishigandha Vad) यांच्याहस्ते (Vidarbha Talent Award) विदर्भ टॅलेंट अवॉर्ड प्रदान करून गौरविण्यात आले.

विदर्भातील AKR2 & NP Group यांच्या वतीने बुलढाणा येथे विदर्भ स्तरीय सिंगिंग कॉम्पिटिशनसह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आराध्या लॉन्स येथील सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या (Vidarbha Talent Award) स्पर्धेत विदर्भातील अनेक गायक-कलावंतांनी सहभाग नोंदवून आपली कला सादर केली. या स्पर्धेत बुलढाणा जिल्हा शिक्षकसेना जिल्हाध्यक्ष तथा प्राचार्य वसंतराव गाडेकर यांची सुकन्या कु. संपदा गाडेकर (Singer Sampada Gadekar) हिने सहभाग घेत उत्कृष्ट गायन सादर केले. तिच्या सुरेल सादरीकरणाने परीक्षक, मान्यवर व उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आणि तिने विदर्भ टॅलेंट अवॉर्ड पटकाविला.

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री निशिगंधा वाड (Actress Nishigandha Vad) यांच्या हस्ते तिला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी ब्रँड ओनर डॉ. अक्सा, नगरसेविका डॉ. मिनलताई गावंडे,  मनिषाताई कोकाटे,  कविता निशाणे,  अपर्णा अंबरकर,  रुपाली नागपुरे, रचना सोनोने,  निकिता जाधव तसेच पुनम खरात यांची प्रमुख उपस्थिती होती.