अभिनेता अनुज ठाकूर याचे निधन

वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी टीव्ही अभिनेत्याचे निधन; झोपेतच घेतला अखेरचा श्वास!

Actor Anuj Thakur Death: टेलिव्हिजन विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील अभिनेता अनुज ठाकूर याचे वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी निधन झाले आहे. ‘बंधन साथ जनमों का’ या लोकप्रिय.

वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी टीव्ही अभिनेत्याचे निधन; झोपेतच घेतला अखेरचा श्वास!

Actor Anuj Thakur Death

 

अनुज ठाकूरच्या अचानक निधनाने मनोरंजन विश्वाला धक्का

मुंबई (Anuj Thakur Death) : टेलिव्हिजन विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील अभिनेता अनुज ठाकूर याचे वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी निधन झाले आहे. ‘बंधन साथ जनमों का’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अनुजच्या अचानक निधनामुळे मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, अनुजने झोपेतच अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या निधनाच्या माहितीने कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

निधनाच्या दहा दिवस आधीच झाली होती मित्रासोबत भेट

अनुज ठाकूरचा (Actor Anuj Thakur Death) जवळचा मित्र आणि कास्टिंग डायरेक्टर रूपेश सोनार (Rupesh Sonar) यांनी अभिनेत्याच्या आठवणींना उजाळा देताना त्याच्याशी संबंधित काही भावनिक गोष्टी सांगितल्या. निधनाच्या अवघ्या दहा दिवस आधीच त्यांची अनुजसोबत भेट झाली होती. त्यावेळी अनुज आनंदी होता. अभिनय क्षेत्रात पुन्हा सक्रिय होण्याची आणि आपल्या करिअरला नव्याने सुरुवात करण्याची त्याची तयारी सुरू होती. मात्र, काही दिवसांनंतर अनुजच्या निधनाची बातमी ऐकावी लागेल, याची कल्पनाही रूपेश यांना नव्हती.

2008 मध्ये झाली होती पहिली भेट

रूपेश सोनार (Rupesh Sonar) यांच्या माहितीनुसार, त्यांची आणि अनुजची ओळख 2008 मध्ये झाली होती. ‘बंधन साथ जनमों का’ या मालिकेच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली. या भेटीतून सुरू झालेली मैत्री पुढे अधिक घट्ट होत गेली. त्यानंतरही दोघांना अनेक टीव्ही प्रोजेक्टमध्ये एकत्र काम करण्याची संधी मिळाली. अनुज हा आपल्यासाठी केवळ सहकारी किंवा मित्र नव्हता, तर तो लहान भावाप्रमाणे होता, असे रूपेश यांनी सांगितले. त्यामुळे त्याच्या अचानक निधनाची बातमी त्यांच्यासाठी मोठा मानसिक धक्का ठरली आहे.

झोपेत हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू

अनुज ठाकूरच्या (Actor Anuj Thakur Death) निधनाची बातमी रूपेश सोनार यांना 30 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मिळाली. एका सामायिक मित्राने फोन करून त्यांना ही दुःखद माहिती दिली. सुरुवातीला रूपेश यांचा या बातमीवर विश्वासच बसला नाही. काही दिवसांपूर्वी झालेली भेट आणि अनुजसोबत झालेल्या गप्पा त्यांच्या डोळ्यांसमोर येत होत्या. यानंतर रूपेश (Rupesh Sonar) यांनी अनुजच्या भावाशी संपर्क साधला. दुसऱ्या दिवशी ते त्याच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेले. त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार, अनुजला रात्री झोपेत असताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याची प्राणज्योत मालवली.

अभिनय क्षेत्रात पुनरागमनाची तयारी असतानाच काळाचा घाला

अनुज ठाकूर (Actor Anuj Thakur Death) आपल्या अभिनय कारकिर्दीला पुन्हा नव्याने सुरुवात करण्याच्या तयारीत होता. करिअरबाबत त्याच्या मनात अनेक योजना होत्या. मात्र, वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी त्याचा असा अचानक मृत्यू झाल्याने त्याच्या स्वप्नांवर विरजण पडले आहे. एका उमद्या कलाकाराच्या अकाली एक्झिटमुळे टीव्ही मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.

संबंधित सामग्री

‘CID’ आणि ‘आहट’चे निर्माता बी. पी. सिंह यांचे निधन; वयाच्या ७७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘CID’ आणि ‘आहट’चे निर्माता बी. पी. सिंह यांचे निधन; वयाच्या ७७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘सीआयडी’चे निर्माते-दिग्दर्शक बी. पी. सिंह यांचे ७७व्या वर्षी निधन. हृदयविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली; अशोक पंडित यांनी वाहिली श्रद्धांजली.

Oct 27, 2026
सोनाली बेंद्रेचा कॅन्सरच्या प्रवासाबद्दल मोठा खुलासा; म्हणाली, ‘ज्यामुळे त्रास होतो, त्यावर प्रेम करणं कठीण असतं’

सोनाली बेंद्रेचा कॅन्सरच्या प्रवासाबद्दल मोठा खुलासा; म्हणाली, ‘ज्यामुळे त्रास होतो, त्यावर प्रेम करणं कठीण असतं’

सोनाली बेंद्रेने कॅन्सरच्या प्रवासाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. माधुरी दीक्षितच्या प्रश्नावर तिने स्वतःच्या शरीराचा स्वीकार करण्यामागचा दृष्टिकोन सांगितला.

Oct 13, 2026
ज्येष्ठ लावणी कलावंत मधू कांबीकर यांचं निधन; वयाच्या ७३व्या वर्षी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ लावणी कलावंत मधू कांबीकर यांचं निधन; वयाच्या ७३व्या वर्षी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचं पुण्यात ७३व्या वर्षी निधन. लावणी, लोकनाट्य आणि १०० हून अधिक चित्रपटांतील त्यांच्या योगदानाचा आढावा.

Oct 12, 2026
नाना पाटेकरांच्या निधनानंतर ‘Evil Dead’ वक्तव्यावरून तनुश्री दत्ता ट्रोल; मीटू मोहिमेनंतरच्या अनुभवांबद्दल काय म्हणाली?

नाना पाटेकरांच्या निधनानंतर ‘Evil Dead’ वक्तव्यावरून तनुश्री दत्ता ट्रोल; मीटू मोहिमेनंतरच्या अनुभवांबद्दल काय म्हणाली?

नाना पाटेकरांच्या निधनानंतर ‘Evil Dead’ वक्तव्यावरून तनुश्री दत्ता ट्रोल. इन्स्टाग्राम व्हिडीओत मीटू मोहिमेनंतरच्या अनुभवांबद्दल तिने भाष्य केले.

Oct 09, 2026
‘मिर्झापूर’चा बॉक्स ऑफिसवर भौकाल!

‘मिर्झापूर’चा बॉक्स ऑफिसवर भौकाल!

Mirzapur Movie ‘मिर्झापूर: द मूव्ही’ ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. 4 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात अंदाजे 24.75 कोटी

Sep 06, 2026