तामिळनाडूच्या राजकारणात एकीकडे नवनिर्वाचित मुख्यमंत्री थलपती विजय आणि दुसरीकडे प्रसिद्ध अभिनेत्री तृषा कृष्णन हिची चर्चा रंगली आहे. अनेकदा थलपती विजय आणि तृषा कृष्णन एकत्र दिसून आले आणि दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले. अशातच थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात पारंपरिक लूकमध्ये मिरवणार्या तृषा कृष्णनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तेव्हापासूनच ती चर्चेत आहे. अशातच आता एक बातमी समोर आली आहे. जिने तमिळ सिनेसृष्टीत मोठी खळबळ उडवून दिलीय. थलपती विजयचे राजकीय प्रतिस्पर्धी उदयनिधी स्टॅलिन यांनी तृषा कृष्णन हिला १२ कोटी रुपयांची भरघोस ऑफर दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जोरदार चर्चांना उधाण आलेय. मीडिया रिपोर्टनुसार, द्रमुकचे एक प्रमुख नेते आणि थलपती विजय यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या उदयनिधी स्टॅलिन यांनी एका मोठ्या सिनेमाच्या प्रोजेक्टसाठी तृषा कृष्णनला १२ कोटी रुपयांची रक्कम देऊ केली आहे. या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेसाठी तृषाचा विचार केला जात असल्याचे सांगितलेय. तृषा कृष्णन हिच्या मानधनात अलीकडेच मोठी वाढ झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ती आता प्रत्येक सिनेमासाठी १० ते १२ कोटी रुपये मानधन आकारते. थलपती विजयसोबतची तिची जोडी, तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आणि 'पोनियिन सेल्वन'सारख्या मोठ्या सिनेमांमधले तिचे अलीकडील काम, यामुळे तेलगू फिल्म इंडस्ट्रीतील तिची लोकप्रियता फारच वाढली आहे. उदयनिधी स्टॅलिन यांची मोठी ऑफर अनेक कारणांमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. उदयनिधी स्टॅलिन हे 'डीएमके' पक्षाचे एक प्रमुख नेते आहेत. आणि हा पक्ष थलपती विजयच्या 'टीव्हीके' पक्षाचा कट्टर प्रतिस्पर्धी आहे. अशातच थलपती विजयच्या कट्टर राजकीय प्रतिस्पर्ध्याने आता तृषा कृष्णन हिला एका मोठ्या फिल्मच्या प्रोजेक्टसाठी विचारल्यामुळे ही बाब सध्या जनतेमध्ये चर्चेचा विषय ठरतेय.
सध्या तरी, तृषा ही ऑफर स्वीकारणार की नाकारणार, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तरीही, तमिळ सिनेसृष्टीतील प्रत्येकाच्या मनात सध्या हाच प्रश्न प्रामुख्याने घोळत आहे. जर तिने या प्रस्तावाला होकार दिला, तर तो केवळ तिच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पाच ठरणार नाही, तर त्यामुळे अनेक लक्षणीय बदलांची मालिकाही सुरू होऊ शकते. विजयच्या शपथविधी सोहळ्यातील तिच्या उपस्थितीमुळे तिच्या लोकप्रियतेत मोठी भर पडली आहे.