Breaking News
  • वर्धा नदीत पाच मुले बुडाली, एकाचा मृतदेह सापडला
  • पुणे विषारी दारू प्रकरण: राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.

होम > महाराष्ट्र

Amalner-Dhule Highway Accident |

अमळनेर-धुळे महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; ६ जणांचा जागीच मृत्यू, साखरपुड्याचा आनंद क्षणात शोकात


अमळनेर-धुळे महामार्गावरील मंगरूळ गावाजवळ सोमवारी सकाळी झालेल्या भीषण तिहेरी अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. भरधाव कार, मोटरसायकल आणि एसटी बस यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक लहान मुलगा थोडक्यात बचावला. या दुर्दैवी घटनेमुळे एका कुटुंबाचा साखरपुड्याचा आनंद क्षणात शोकात बदलला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे ७ वाजता मंगरूळ गावाजवळील हॉटेल वृंदावन परिसरात हा अपघात घडला. धुळ्याकडून येणाऱ्या भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने समोरून येणाऱ्या एसटी बस आणि मोटरसायकलला जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज इतका भीषण होता की परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले.
या अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तसेच कारमधील पाच प्रवाशांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. मृत सर्वजण गुजरातमधील व्यारा येथील एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. ते अमळनेर येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी येत होते. मात्र नियतीने त्यांच्यावर काळाचा घाला घातल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
मृतांमध्ये आदित्य चंद्रकांत महाजन, अनिता सुरेश महाजन, निर्मला नंदलाल महाजन, नंदलाल गोपाल महाजन आणि सुरेश विक्रम महाजन यांचा समावेश आहे. अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला होता.
दरम्यान, कारमध्ये अडकलेल्या एका लहान मुलाला स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. तसेच एसटी बसमलीप पाटील हे प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच ‘११२’ आपत्कालीन सेवेच्या माध्यमातून पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली मदत व बचावकार्य राबविण्यात आले. जखमींना ‘१०८’ रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलविण्यात आले.
या दुर्घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
 

Related to this topic: