पृथ्वीवरील जीवनचक्र समतोल राखण्यासाठी जंगलांची मूल्ये, महत्त्व आणि योगदान याविषयी समुदायांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी २१ मार्च रोजी जागतिक वन दिन किंवा आंतरराष्ट्रीय वन दिन जगभरात साजरा केला.
नागपूर (World Forest Day) : पृथ्वीवरील जीवनचक्र समतोल राखण्यासाठी जंगलांची मूल्ये, महत्त्व आणि योगदान याविषयी समुदायांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी २१ मार्च रोजी जागतिक वन दिन किंवा आंतरराष्ट्रीय वन दिन जगभरात साजरा केला जातो.
लोकांमध्ये वृक्षसंवर्धनाच्या बाबतीत जाणीव जागृती व्हावी यासाठी २१ मार्च हा दिवस जागतिक वन दिनङ्ग म्हणून १९७१ मध्ये युरोपियन कॉनफिडरेषण ऑफ अग्रिकल्चरच्या बैठकीत हा दिन साजरा करण्याची संकल्पना पुढे आली.
संयुक्त राष्ट्र महासभेने २०१२ मध्ये २१ मार्च हा आंतरराष्ट्रीय वन दिन म्हणून घोषित केला. यंदा २०२६ च्या आंतरराष्ट्रीय वन दिनाची संकल्पना' वने आणि अर्थव्यवस्था' ही असून, आर्थिक समृद्धीला चालना देण्यात वनांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा गौरव करण्यात येत आहे.
पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टी कोणत्या ना कोणत्या प्रकारे जंगलांच्या अस्तित्वाशी संबंधित आहे. आपण जे पाणी पितो, तसेच आपण घेतो ती औषधे, आपण जे अन्न उपभोगतो, आपण ज्या आश्रयाखाली आलो आहोत आणि आपल्याला हवा असलेला प्राणवायू या सर्वांचा जंगलांशी संबंध आहे. पृथ्वीच्या भूभागापैकी एक तृतीयांश भाग जंगलांनी व्यापलेला आहे, जगभरातील महत्त्वपूर्ण कार्ये जंगल करत आहेत. सुमारे १.६ अब्ज लोक - २,००० हून अधिक देशी संस्कृतींसह त्यांच्या उपजीविकेसाठी, औषधे, इंधन, अन्न आणि निवारा यासाठी जंगलांवर अवलंबून आहेत.
भारतीय राज्य शासनाच्या वनविभागाच्या २०११ च्या अहवालानुसार, संपूर्ण भारतात एकूण क्षेत्रफळाच्या २३.८१ज्ञ म्हणजेच जवळ जवळ ७८.२९ मिलियन हेक्टर वन्य क्षेत्र आहे. इतर बऱ्याच देशांपेक्षा भारतात अधिक प्रमणात जैवविविधता आढळते. संरक्षित वने आणि अभयारण्ये यांच्या मार्फत भरता मध्ये वन्य संरक्षणाचा चांगला उपक्रम राबवला जातो. नियमा प्रमाणे १ झाडं तोडल्यास १० झाडे लावली पाहिजेत असा वन्य खात्याचा कायदा सांगतो. दुर्दैवाची गोष्ट अशी की इतर कायद्यांप्रमाणे हा कायदादेखील धाब्यावर बसवला जातो.
राज्यात वनसंपदेच्या संवर्धनासाठी सकारात्मक प्रयत्न होत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातील ग्रीन कव्हरमध्ये ९७५ चौरस किलोमीटरची वाढ नोंदविण्यात आली आहे. मात्र, ही वाढ केवळ ओपन फॉरेस्टमध्ये झाली आहे. संरक्षित वनक्षेत्र मात्र घटले असल्याचे दिसते. त्यातही वनसंपदेची भिस्त असलेल्या विदर्भातील वनक्षेत्र जवळपास १४६ चौरस किमीने घटल्याची नोंद स्टेट फॉरेस्ट सर्व्हेच्या २०१९च्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. विदर्भातील वनक्षेत्रात घट झालेली आहे. त्यातही गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यातील वनक्षेत्रात झालेली कमतरता चिंतेची बाब आहे. याशिवाय अमरावती व वर्धामध्ये साधारण घट झाली आहे. मात्र, गोंदियामध्ये १५.५९ चौरस किलोमीटर, अकोल्यात १.३७ चौरस किलोमीटर व यवतमाळमध्ये १.३२ चौरस किलोमीटरची वाढ नोंदविण्यात आली आहे.