Vasmat Gram Panchayat Reservation: मुदत संपत आलेल्या वसमत तालुक्यातील 106 ग्राम पंचायतीच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाने वेळ घेतला असून 106 ग्राम पंचायतीची आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
वसमत (Vasmat Gram Panchayat Reservation) : मुदत संपत आलेल्या वसमत तालुक्यातील 106 ग्राम पंचायतीच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाने वेळ घेतला असून 106 ग्राम पंचायतीची आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम लागल्याने व आरक्षण होणार असल्याने ग्रामपंचायत स्तरावर इच्छुकांनी मोर्चे बांधणे सुरू केली आहे. आरक्षण कार्यक्रमानंतर 10 जुलैला आरक्षणाची अंतिम प्रसिद्धी देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, राज्यातील मुदत संपलेल्या आणि संपत आलेल्या सुमारे १५,६३६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांची आरक्षण (Vasmat Gram Panchayat Reservation) सोडत जाहीर झाली आहे. यामध्ये वसमत तालुक्यातील106 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सन २०२४, २०२५ मध्ये तसेच २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी हा कार्यक्रम राबवला जात आहे. आरक्षण सोडत कार्यक्रम म्हणजे निवडणूक लागल्याची नांदी आहे आरक्षणा नुसार त्याच्या प्रभागात इच्छुक कामाला लागणार आहेत यांना निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांचा आरक्षणानंतर मार्ग मोकळा होणार आहे.
वसमत तालुक्यातील १०६ ग्रामपंचायतीचे आरक्षण करण्यात येणार आहे यामध्ये कुरुंदा, गिरगाव, हट्टा, आडगाव, आंबा, हयातनगर, पांगरा शिंदे, बाभुळगाव, करंजाळा, आरळ, खांडेगाव, गुंडा, पळसगाव, दारेफळ, माळवटा, टेंभुर्णी, आसेगाव, आकोली सोमठाणा या प्रमुख ग्रामपंचायतीसह 106 ग्रामपंचायतचा समावेश आहे.
ग्रामपंचायत च्याप्रभागनिहाय आरक्षण (Vasmat Gram Panchayat Reservation) सोडतीची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाणार आहे. ८ जून २०२६ आरक्षण सोडत काढण्यासाठी विशेष ग्रामसभेची अधिकृत सूचना दिली जाईल. १२ जून २०२६ तहसीलदारांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती ,ओबीसी आणि महिलांच्या आरक्षणाची अंतिम सोडत प्रत्यक्ष काढली जाईल.
१७ जून जिल्हाधिकारी या प्रारूप अधिसूचनेस मान्यता देतील.
१९ जून प्रभागनिहाय आरक्षण प्रारूप नागरिकांसाठी प्रसिद्ध केले जाईल.
१९ ते २५ जून या कालावधीत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे.
८ जुलै जिल्हाधिकारी अंतिम अधिसूचनेस अंतिम मान्यता देतील.
१० जुलै रोजी अंतिम आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे.
अंतिम आरक्षण (Vasmat Gram Panchayat Reservation) जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या तयारीत असलेल्या इच्छुक उमेदवारांच्या हालचालीला वेग येणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण पडणार याकडे इच्छुकांचे व सर्वांचे लक्ष लागले आहे.