Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > महाराष्ट्र

SBI ग्राहकांनो लक्ष द्या! २३ मेपासून सलग ६ दिवस शाखा बंद राहण्याची शक्यता

जर तुमचे खाते State Bank of India मध्ये असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.


sbi ग्राहकांनो लक्ष द्या २३ मेपासून सलग ६ दिवस शाखा बंद राहण्याची शक्यता

SBI Strike |

(SBI Strike) जर तुमचे खाते State Bank of India मध्ये असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI च्या शाखा २३ मे २०२६ पासून सलग सहा दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रस्तावित संपामुळे शाखांचे कामकाज प्रभावित होणार असल्याचे समोर आले आहे. मात्र, ऑनलाइन सेवा सुरळीत सुरू राहतील, असे बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २३ मे रोजी महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील. त्यानंतर २४ मे रोजी नियमित रविवारची सुट्टी आहे. त्यामुळे सलग दोन दिवस शाखा बंद राहणार आहेत. पुढे २५ आणि २६ मे रोजी SBI कर्मचारी संघटनांनी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे या दोन दिवसांतही शाखांमधील व्यवहार ठप्प होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याशिवाय, Reserve Bank of India कडून बकरी ईदनिमित्त २७ आणि २८ मे रोजी काही भागांत बँक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विशेषतः जम्मू-काश्मीरमध्ये दोन्ही दिवशी बँका बंद राहणार असल्याने काही ठिकाणी सलग सहा दिवस बँकिंग सेवा प्रभावित होऊ शकतात.

दरम्यान, या संपामागे नोकऱ्यांचे आउटसोर्सिंग, करिअर प्रोग्रेशन स्कीम, HRMS संबंधित समस्या तसेच NPS फंड व्यवस्थापकांच्या भरती प्रक्रियेतील मुद्दे असल्याचे सांगितले जात आहे. ‘ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशन’ने या मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ग्राहकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, यूपीआय व्यवहार आणि एटीएम सेवा पूर्ववत सुरू राहणार आहेत. त्यामुळे डिजिटल व्यवहार किंवा रोख रक्कम काढण्यात अडचण येणार नाही. मात्र, चेक क्लिअरन्स, डीडी, खाते उघडणे आणि इतर शाखा-आधारित सेवा प्रभावित होऊ शकतात. त्यामुळे ग्राहकांनी २३ मेपूर्वीच महत्त्वाची बँकिंग कामे पूर्ण करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

Related to this topic: