Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > महाराष्ट्र

सांगली दुहेरी मृत्यू

दुहेरी मृत्यूकांड...पती-पत्नीचा एकामागून एक संशयास्पद मृत्यू

Sangli Double Death: बाळासाहेब मुरलीधर कदम यांचा राहत्या घरी मृत्यू, तर त्यांच्या पत्नी उषा बाळासाहेब कदम यांचा उपचार सुरू असताना सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात मृत्यू


दुहेरी मृत्यूकांडपती-पत्नीचा एकामागून एक संशयास्पद मृत्यू

Sangli Double Death |

सांगली (Sangli Double Death) : सांगली जिल्ह्यातील पलूस शहरातील पती-पत्नीने विषारी औषध प्राशन करून जीवन संपवल्याने एकच खळबळ उडाली आहे. बाळासाहेब मुरलीधर कदम (वय ५८) यांचा आपल्या राहत्या घरी मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी उषा बाळासाहेब कदम (वय ४६) यांचा उपचार सुरू असताना काल मंगळवारी सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात मृत्यू झाला. याबाबत त्यांचा मुलगा अजय कदम यांनी माहिती दिली.

दोघांनी विषारी औषध प्राशन (Sangli Double Death) केल्याचा संशय असून, या दुहेरी मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, घरगुती वादातून त्यांनी आयुष्य संपवल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. मुलगा अजय कदम हा आई-वडिलांपासून वेगळा कागल येथे राहतो.

घरगुती वादाचा संशय
बाळासाहेब कदम व त्यांची पत्नी उषा हे दोघेच पलूस येथे राहत होते. ३० ऑगस्ट रोजी दोघांमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला असावा. यातूनच पत्नी उषा यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने त्यांना पलूस येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर पत्नीची प्रकृती गंभीर बनत असल्याचे लक्षात येताच, ३१ ऑगस्ट रोजी स्वतः बाळासाहेब कदम यांनीही विषारी औषध प्राशन केले.

पत्नीची प्रकृती बिघडताच पतीचे टोकाचे पाऊल
बाळासाहेब हे बेशुद्ध अवस्थेत असून, त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याची बाब त्यांचा मुलगा अजय कदम याच्या निदर्शनास आली. त्यांना तात्काळ नातेवाईकांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, (Sangli Double Deat)h डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, उषा कदम यांची प्रकृतीही गंभीर बनत चालली होती. हे डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर सोमवारी पुढील उपचारासाठी त्यांना सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच मंगळवारी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.