हिंदू धर्मरक्षक, पराक्रमी आणि अद्वितीय शौर्याचे प्रतीक असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाची प्रेरणा घेऊन येत्या गुढीपाडव्याला प्रत्येक घरावर स्वराज्याचा भगवा ध्वज फडकवावा.
गुढीपाडव्याला प्रत्येक घरावर भगवा ध्वज फडकवा: आ. गायकवाड
बुलढाणा (MLA Sanjay Gaikwad) : हिंदू धर्मरक्षक, पराक्रमी आणि अद्वितीय शौर्याचे प्रतीक असलेल्या छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या बलिदानाची प्रेरणा घेऊन येत्या गुढीपाडव्याला (Gudi Padwa) प्रत्येक घरावर स्वराज्याचा भगवा ध्वज फडकवावा, असे आवाहन (MLA Sanjay Gaikwad) आ. संजय गायकवाड यांनी केले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांनी (Chhatrapati Sambhaji Maharaj) स्वराज्य, धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. अत्यंत कठोर यातना सहन करतानाही त्यांनी धर्मांतर नाकारत अखेर आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांचे बलिदान हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून, प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी आदर्श असल्याचे गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा प्रारंभ असून नवचैतन्य, विजय आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे.
या दिवशी उभारली जाणारी गुढी ही विजयाची आणि गौरवशाली परंपरेची साक्ष देणारी असते. अशा पवित्र दिवशी प्रत्येकाने आपल्या घरावर भगवा ध्वज फडकवून (Chhatrapati Sambhaji Maharaj) संभाजी महाराजांच्या त्यागाची आठवण जपावी. प्रत्येक घरावर भगवा ध्वज फडकला, तर तो केवळ एक प्रतीक न राहता आपल्या संस्कृतीप्रती निष्ठा, स्वराज्याप्रती अभिमान आणि धर्मरक्षणाची प्रेरणा यांचे जिवंत दर्शन घडवेल, असा विश्वासही त्यांनी (MLA Sanjay Gaikwad) व्यक्त केला.
चला, या (Gudi Padwa) गुढीपाडव्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची प्रेरणा घेऊन स्वराज्याचा भगवा प्रत्येक घरावर उभारूया आणि आपल्या महान इतिहासाला अभिवादन करूया, असे आवाहन आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी केले.