Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > महाराष्ट्र

शेतकरी बैल मृत्यू

वीज पडून बैल दगावला; पेरणी थांबू नये, म्हणून पत्नीला जुंपले औताला!

Farmer Bull Death: बोंबळी येथे शेतकरी काशीनाथ गायकवाड यांच्या बैलावर वीज कोसळल्यानंतर मृत्यू झाला. शेती कामे थांबू नयेत म्हणून त्यांनी पत्नीला औताला जुंपले. समाजात मदतीची मागणी होत आहे.


वीज पडून बैल दगावला पेरणी थांबू नये म्हणून पत्नीला जुंपले औताला

Farmer Bull Death |

 

बोंबळी येथील शेतकरी काशीनाथ गायकवाड यांचा संघर्ष; व्हिडिओ व्हायरल होताच हळहळ, मदतीची मागणी

देवणी (Farmer Bull Death) : शेतकऱ्याच्या आयुष्यात बैल हा केवळ जनावर नसतो, तर तो त्याचा खरा साथीदार, आधार आणि शेतीचा कणा असतो. मात्र निसर्गाच्या एका फटक्यात हा आधार हिरावला गेला आणि त्यानंतरही शेतीची कामे थांबू नयेत म्हणून एका शेतकऱ्याने स्वतःच्या पत्नीला औताला जुंपून मशागतीची कामे सुरू ठेवल्याची हृदयद्रावक घटना देवणी तालुक्यातील बोंबळी येथे घडली आहे. या (Farmer Bull Death) घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून संबंधित शेतकऱ्याला तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे.

बोंबळी येथील अल्पभूधारक शेतकरी काशिनाथ गायकवाड यांचा उदरनिर्वाह पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. दि. ५ जून रोजी तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसादरम्यान त्यांच्या बैलावर वीज कोसळली. या दुर्घटनेत बैलाचा जागीच मृत्यू झाला. आधीच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या गायकवाड कुटुंबावर या (Farmer Bull Death) घटनेने मोठे संकट कोसळले. सध्या पावसाळ्याच्या तोंडावर मशागत, कुळवणी आणि पेरणीपूर्व कामांची लगबग सुरू आहे. अशा वेळी बैलाचा मृत्यू झाल्याने शेतीची सर्व कामे ठप्प होण्याची वेळ आली.

नवीन बैल खरेदी करण्याइतकी आर्थिक परिस्थिती नसल्याने आणि पेरणीचा हंगाम हातातून जाऊ नये म्हणून काशिनाथ गायकवाड यांनी पत्नीच्या मदतीने औत चालवत शेतातील कामे सुरू ठेवली. शेतात पत्नी औताला जुंपलेली आणि स्वतः नांगर हाकत असलेले दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले. ही घटना केवळ एका कुटुंबाची व्यथा नसून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या वास्तवाचे जिवंत चित्र असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

ग्रामीण भागात बैल (Farmer Bull Death) हा शेतकऱ्याचा अविभाज्य घटक मानला जातो. ट्रॅक्टर आणि यांत्रिकीकरण वाढले असले तरी आजही अनेक लहान व अल्पभूधारक शेतकरी बैलजोडीवरच अवलंबून आहेत. बैल नसल्यास मशागत, पेरणी आणि इतर शेतीची कामे विस्कळीत होतात. त्यामुळे एका बैलाचा मृत्यू म्हणजे केवळ पशुधनाचे नुकसान नसून संपूर्ण शेती व्यवस्थेचा आधारच डळमळीत होतो.

दरम्यान, गायकवाड यांच्या संघर्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून अनेकांनी त्यांच्या जिद्दीचे कौतुक करताना शासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी केली आहे. वीज पडून मृत्यू झालेल्या बैलाचा पंचनामा करून नुकसानभरपाई मंजूर करावी तसेच शेतकऱ्याला नवीन बैलजोडी खरेदीसाठी विशेष आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकरी करीत आहेत.

बैल म्हणजे शेतकऱ्याचा खरा साथीदार...
ग्रामीण शेती व्यवस्थेत बैलाला केवळ पशुधन म्हणून पाहिले जात नाही. बैल हा शेतकऱ्याचा विश्वासू सहकारी आणि कुटुंबातील सदस्यासारखा असतो. नांगरणी, कुळवणी, पेरणी, वाहतूक अशा अनेक कामांसाठी त्याच्यावरच शेतीचा गाडा चालतो. त्यामुळे एका बैलाचा मृत्यू (Farmer Bull Death) म्हणजे केवळ आर्थिक नुकसान नसून शेतकऱ्याच्या श्रमशक्तीचा आणि शेतीच्या आधाराचा मोठा धक्का असतो. बोंबळी येथील घटना ही याच वास्तवाची वेदनादायी साक्ष ठरत आहे.

शेतकऱ्याच्या उपजीविकेवर झालेला आघात
"वीज पडून बैल दगावणे ही केवळ एक दुर्घटना नाही, तर एका गरीब शेतकऱ्याच्या उपजीविकेवर झालेला आघात आहे. शासनाने अशा प्रकरणांमध्ये तातडीने मदत आणि नुकसान भरपाई देण्याची गरज आहे." 
- पं.स. माजी सभापती शंकरराव पाटील तळेगावकर

Related to this topic: