Rahul Gandhi: राहुल गांधी हे पळून जाणारे नव्हे, तर प्रश्नांना भिडणारे नेते आहेत. उलट संसदेत महत्त्वाच्या प्रश्नांवरील चर्चेपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पळ काढत आहेत..
मुंबई (Rahul Gandhi) : झारखंडमधील सरकारी भरती परीक्षांतील कथित गोंधळाविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) हे पळून जाणारे नव्हे, तर प्रश्नांना भिडणारे नेते आहेत. उलट संसदेत महत्त्वाच्या प्रश्नांवरील चर्चेपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) पळ काढत आहेत, असा पलटवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी केला.
झारखंडमध्ये सरकारी भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर अश्रुधुराचा वापर आणि लाठीमार करण्यात आल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर टीका करत, ते झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला कधी भेट देणार, असा सवाल उपस्थित केला होता.
या टीकेला उत्तर देताना सपकाळ म्हणाले की, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याबाबत संसदेत चर्चा करण्याची मागणी विरोधक सातत्याने करीत आहेत. मात्र, या चर्चेला सामोरे जाण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) घाबरत असल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या १२ वर्षांत पंतप्रधानांनी एकही पत्रकार परिषद घेतली नसल्याचा मुद्दाही सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र काँग्रेसच्या मध्यवर्ती समितीची बैठक मुंबईतील पक्ष मुख्यालयात झाली. बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यासह राज्यातील राजकीय, सामाजिक आणि अन्य महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. आगामी राजकीय रणनीतीबाबतही बैठकीत विचारविनिमय झाल्याचे सांगण्यात आले.