Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > महाराष्ट्र

ग्लोबल मराठा एक्स्पो

पुण्यातील ‘ग्लोबल मराठा एक्स्पो’ मराठी उद्योजकांसाठी सुवर्णसंधी: संजय पाटील वायाळ

Global Maratha Expo: पुण्यात आयोजित ‘ग्लोबल मराठा एक्स्पो २०२६’ मध्ये १००० हून अधिक स्टॉल्स असून, कृषी, तंत्रज्ञान, स्टार्टअप आणि सेवा क्षेत्रातील नवीन संधींची माहिती प्रदान केली जाणार आहे.


पुण्यातील ‘ग्लोबल मराठा एक्स्पो’ मराठी उद्योजकांसाठी सुवर्णसंधी संजय पाटील वायाळ 

Global Maratha Expo |

सिंदखेड राजा (Global Maratha Expo) : मराठी उद्योजकांना जागतिक स्तरावर ओळख निर्माण करून देण्यासाठी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्लोबल मराठा एक्स्पो २०२६’ च्या जनजागृतीसाठी सिंदखेड राजा येथे विशेष संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. येथील शासकीय विश्रामगृहावर ईश्वद बायोटेकचे संचालक संजय वायाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधून या भव्य प्रदर्शनाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार अजित दिवटे, सुधाकर पाटील यांच्यासह एक्स्पोचे विविध पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
   
पत्रकारांशी बोलताना संजय वायाळ (Sanjay Patil Wayal) म्हणाले की, "आजच्या स्पर्धात्मक युगात मराठी उद्योजकांनी केवळ स्थानिक न राहता जागतिक बाजारपेठेचा विचार करणे आवश्यक आहे. या एक्स्पोच्या माध्यमातून १००० हून अधिक स्टॉल्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील उद्योग आपले सादरीकरण करणार आहेत. कृषी, तंत्रज्ञान, स्टार्टअप आणि सेवा क्षेत्रातील नवीन संधींची माहिती याठिकाणी मिळणार आहे."

 तहसीलदार अजित दिवटे यांनी या (Global Maratha Expo) उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि नवउद्योजकांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान समजून घेतले पाहिजे. प्रशासकीय स्तरावरही अशा विधायक उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाईल, असे त्यांनी नमूद केले.१५, १६ आणि १७ मे २०२६, मोशी प्रदर्शन केंद्र, पुणे. ७ ते १० लाख भेटी देणाऱ्यांची शक्यता आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती. स्टार्टअप फंड, एआय (AI) तंत्रज्ञान आणि सरकारी योजनांवर विशेष चर्चासत्रे. यावेळी एक्स्पोच्या पदाधिकाऱ्यांनी सिंदखेड राजा तालुक्यातील जास्तीत जास्त तरुण उद्योजकांनी आणि शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

Related to this topic: