Khedegaon Youth Death: धानोरी येथील पंकज दिलीप वाटगुरे (वय अंदाजे २५ वर्ष )या युवकाचा गावाशेजारील तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
खेडेगाव येथील घटना, ताजी असतांनाच पुन्हा काळाचा घाला
घरचा कमावता युवक पंकज दिलीप वाटगुरे यांचा दुर्दैवी अंत;
अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर दुसऱ्या दुर्घटनेने परिसर शोकसागरात
कुरखेडा/ गडचिरोली (Khedegaon Youth Death) : काल खेडेगाव येथील सती नदीत बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ताजी असतानाच आज पुन्हा कुरखेडा तालुक्यातील धानोरी येथे आणखी एक दुर्दैवी दुर्घटना घडली. धानोरी येथील पंकज दिलीप वाटगुरे (वय अंदाजे २५ वर्ष )या युवकाचा गावाशेजारील तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (दि. २) सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंकज वाटगुरे हे व्यवसायाने ऑटोचालक असून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. आज दिवसभराच्या च्या घरचा रोवणीचा काम आटपून आंघोळ करण्यासाठी ते गावाशेजारील तलावात गेले. तलावात उतरल्यावर पाण्याच्या खोलीचा योग्य अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. काही वेळानंतर ही बाब परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आली. त्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली.
घटनेची माहिती मिळताच तलाठी चेतन मडावी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी (Khedegaon Youth Death) मृतदेह बाहेर काढण्यासाठी विशेष पथकाला पाचारण केले असून, स्थानिक मासेमारांच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आले आहे. वृत्त लिहिपर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.
विशेष म्हणजे, कालच खेडेगाव येथील सती नदीत तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची वेदनादायी घटना घडली होती. त्या (Khedegaon Youth Death) घटनेनंतर अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आज पुन्हा एका युवकाचा बळी गेल्याने संपूर्ण कुरखेडा तालुका हादरला असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. पंकज वाटगुरे हे कुटुंबातील घरचे कमावते सदस्य होते. ऑटो चालवून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.