Nashik Food Fraud: नांदगाव तालुक्यात अस्वच्छ वातावरणात साठवलेले 196 लिटर दूध थेट नष्ट करण्यात आले आहे. शहरातील रविवार पेठ येथील संजय भागचंद बुरड यांच्या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाच्या पथक तपासणी
नाशिक (Nashik Food Fraud) : नाशिक शहर आणि ग्रामीण भागात 'एफडीए'ने धडक कारवाई करीत विनापरवाना व संशयास्पद अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे. रविवार पेठेतून पावणेतीन लाख रुपयांचे विविध बँडचे भेसळीचे तूप जप्त करण्यात आले असून, नांदगाव तालुक्यात अस्वच्छ वातावरणात साठवलेले 196 लिटर दूध थेट नष्ट करण्यात आले आहे. शहरातील रविवार पेठ येथील संजय भागचंद बुरड यांच्या ठिकाणी 10 ऑगस्ट रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अचानक तपासणी केली.
या (Nashik Food Fraud) वेळी तेथे कोणत्याही प्रकारचा अन्न परवाना नसताना अनधिकृतपणे विविध ब्रँडचे तूप विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे उघडकीस तूप कमी दर्जाचे असल्याच्या संशयावरून 'एफडीए'ने कारवाई करून केएमपी कृष्णा काउ तूप, माधुली काउ तूप, श्रीमायी काउ तूप या तीन ब्रँड्सचा एकूण 397.600 किलो साठा (किंमत रु. 2 लाख 75 हजार 812) जप्त केला आहे. याचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
नांदगाव तालुक्यात 196 लिटर दूध नष्ट
ग्रामीण भागात राबवलेल्या मोहिमेअंतर्गत 7 ऑगस्ट रोजी नांदगाव तालुक्यातील अनकवाडे येथील दूध विक्रेते चंद्रकांत गरुड यांच्याकडे तपासणी करण्यात आली. तेथे विनानोंदणी व्यवसाय सुरू असल्याचे आणि अत्यंत अस्वच्छ वातावरणात दूध साठवल्याचे आढळले. हे दूध मानकांपेक्षा कमी दर्जाचे असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याने गाईच्या दुधाचे नमुने घेऊन उर्वरित 196 लिटर दुधाचा साठा जागीच नष्ट करण्यात आला.
तपासणीमध्ये औषध तयार करण्यासाठी आवश्यक तज्ज्ञ कर्मचारी नसणे, औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नसणे, आवश्यक यंत्रसामग्रीचा अभाव आणि उत्पादन परिसर अस्वच्छ आढळून आल्याने कारवाई करण्यात आली. काही ठिकाणी कच्चा माल आणि तयार औषधांची तपासणी केली जात नसल्याचेही दिसून आले. तसेच औषध तयार केल्याच्या नोंदी व्यवस्थित नसणे, लेबलवर चुकीचा उत्पादन तारीख नमूद असणे आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या नोंदी नसणे, अशा त्रुटीही आढळल्या.
औषध तयार करताना एका औषधाचा दुसऱ्या औषधात मिसळ होऊ नये, यासाठीही काही ठिकाणी आवश्यक काळजी घेतली जात नसल्याचे समोर आले. दरम्यान, एफडीएने राज्यातील 434 आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांची तपासणी केली. नियमांचे पालन न करणाऱ्या 135 संस्थांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे एफडीए प्रशासनाने सांगितले.