Breaking News
  • आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घोड्यावर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला
  • धक्कादायक! बुलढाण्यात सिलेंडरचा स्फोट झाल्यानं घराला भीषण आग, 85 वर्षीय वृद्धेचा मृत्यू
  • भिवंडीत तरुणाचा साप गळ्यात घालून स्टंट; व्हिडिओ व्हायरल
  • भाजपचे शहराध्यक्ष नितीन धांडे आमदार व्हावे यासाठी साकडे घालणार- नवनीत राणा
  • नागपूरच्या धरमपेठ परिसरात मध्यरात्री वादातून 20 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याची चाकूने हत्या करण्यात आली. आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
  • पेपर लीकनंतर सरकारने NEET परीक्षा रद्द केली!
  • NEET UG 2026 परीक्षा रद्द; प्रकरणाची चौकशी CBI कडून होणार
  • आता नेपाळ जाण्यासाठी 'विशेष ओळखपत्र' दाखवणे अनिवार्य
  • रोहित आणि कोहली MS धोनीच्या खास क्लबमध्ये दाखल!

होम > महाराष्ट्र

बुआ तेथे बाया, वृक्ष तेथे छाया

प्रा. श्याम मानव यांच्या व्याख्यानास नांदेडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

Prof. Shyam Manav: नांदेडमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विषयावर प्रा. श्याम मानव यांचे व्याख्यान झाले. त्यांनी ढोंगी बाबा, ज्योतिषी व अंधश्रद्धांवर भाष्य केले व जनजागृतीची आवश्यकता बोलले.


प्रा श्याम मानव यांच्या व्याख्यानास नांदेडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद 

Prof. Shyam Manav |

नांदेड (Prof. Shyam Manav) : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांच्या व्याख्यानाचे आयोजन नांदेड येथिल कै. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात ४ मे रोजी सायंकाळी ६:३० वाजता करण्यात आले होते. भोंदू बाबा अशोक खरात याच्या सह देशातील अनेक बाबांच्या फसवणूक व महिला शोषण झालेल्या सत्य कथा त्यांनी पुराव्याणीशी आपल्या व्याख्यानात मांडल्या

महिला बाबाच्या नादी का लागतात व कश्या फसतात?, बुआ आणि ज्योतिषी महिलांना कसे फसवतात? कोणती प्रलोभने दिली जातात? शारीरिक व आर्थिक शोषण कसे होते? ढोंगी बाबांना ओळखायचे कसे? जादूटोणा विरोधी कायद्यात बाबावर कारवाई होऊ शकते काय? आदी विषयांवर प्रत्यक्ष भंडाफोड व विविध प्रकरणाचा उहापोह प्रा. श्याम मानव (Prof. Shyam Manav) सरांनी केला.

प्राध्यापक मानव यांनी बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री महाराज यांना दहा व्यक्तीचे नाव व मोबाईल नंबर आणि वस्तू ठेवलेल्या आपल्या दिव्या शक्तीने ओळखून दाखवाव्यात आणि त्यांनी 80 लाखाचं बक्षीस घ्याव असं आव्हान दिलं होतं परंतु धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी हे आव्हान न स्विकारता  नागपूर येथून पळ काढला.महाराष्ट्राला जर या अंधश्रद्धा,भोंदू बाबा, जादूटोणातून मुक्त करायचं असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन अधिक बळ द्यायला हवं, असे (Prof. Shyam Manav) प्रतिपादन केले.

व्याख्यान ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक प्रा. इरवंत सूर्यकार , बुवाबाजी विरोधी अभियानाचे प्रमुख तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष अ.भा. अंनिसचे सुरेश झुरमुरे यांनी अभियान कश्या प्रकारे राबविण्यात येत आहे याबाबत सविस्तर माहिती दिली. उदघाट्न अंनिस च्या कार्यकर्त्या प्रा. सुलोचनाताई मुखेडकर यांनी केले तर  माकपचे राज्य समितीचे जेष्ठ नेते कॉ.विजय गाभने यांनीही सभेला संबोधित केले.सूत्रसंचालन उज्वला पडलवार यांनी केले. तर आभार प्रा. देविदास इंगळे यांनी मांनले.

मंचावर राष्ट्रीय भारतीय काँग्रेसचे नेते माजी सनदी अधिकारी एकनाथ मोरे, माजी उप महापौर आंनद चव्हाण,डॉ. सचिन सरोदे,डॉ.विठ्ठल भंडारे, ऍड. कॉ. प्रदीप नागापूरकर प्रा.अनंत राऊत आदी नेतेगण उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. इरवंत सूर्यकार, प्रा. देविदास इंगळे,दत्ता तुमवाड,प्रा. ब. ना. गोइनवाड,प्रज्ञाधर कांबळे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.

Related to this topic: