Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > महाराष्ट्र

नागपूर में आरोग्य सेवा उपक्रम

नागपूर आरोग्य सेवा उपक्रम ने 12 लाख से अधिक लोगों की मदद की

नागपूर में 'दवाखाना आपल्या दारी' योजना के तहत 12 लाख रुग्णों को सेवाएं दी गईं, जिसमें मोबाइल वैद्यकीय वाहनों के जरिए स्वास्थ्य सेवाएं प्रदान की गईं।


नागपूर आरोग्य सेवा उपक्रम ने 12 लाख से अधिक लोगों की मदद की

नागपूर (Nagpur Initiative) : दुर्गम भागातही आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, कुणीही उपचाराविना राहू नये, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या’ दवाखाना आपल्या दारी’ या उपक्रमाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २०२३ मध्ये नागपूर जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठान सुरू केलेला हा उपक्रम नागरिकांसाठी वरदान ठरला असून १२ लाख १७हजार रुग्णांनी लाभ घेतला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला होता शुभारंभ

त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी अशा प्रकारचा उपक्रम सुरू करणारा नागपूर हा राज्यातील पहिलाच जिल्हा आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा प्रारंभ डिसेंबर २०२३ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘दवाखाना आपल्या दारी’ची सुरुवात झाली होती. पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नसल्याने ज्यांच्या आरोग्याची हेळसांड होत होती, अशा नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात २६ मोबाईल वैद्यकीय वाहनांद्वारे मोफत प्राथमिक उपचार, तपासणी आणि औषधे पुरविण्याचे काम ‘दवाखाना आपल्या दारी’ द्वारे करण्यात येत आहे. यामुळे गरीब व ज्येष्ठ नागरिकांना तातडीची आरोग्य सेवा मिळू लागली. फिरत्या व्हॅनद्वारे तपासणी, निदान, मोफत औषधोपचार आणि महत्त्वाच्या आरोग्य योजनांचा लाभया उपक्रमांमुळे सामान्य लोकांना घेता येत आहे. ११ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत तब्बल १४ लाख २९ हजार ९८३ रुग्णांची तपासणी ‘दवाखाना आपल्या दारी’तून झाली आहे. यात २६८५ मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच तपासणीत आढळलेल्या १८५ क्षय व १२० कुष्ठरोग रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. ११२ रुग्णांना मुख कर्करोग झाल्याचे आढळून आले. त्यातील ५९ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. अशीच शस्त्रक्रिया स्तन कर्करोगाच्या २४ रुग्णांवर करण्यात आली. प्रजनन व बालआरोग्य कार्यक्रम, असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग, स्तन कर्करोग, राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम, सिकलसेल नियंत्रण, राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम, राष्ट्रीय क्षयरोग निमूर्लन, राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंधन व नियंत्रण, राष्ट्रीय कुटुंब नियोजन कायक्रम या उपक्रमांद्वरे राबविण्यात येत आहेत. अशा उपक्रमामुळे नागरीकांच्या वेळेचीव पैशाची बचततर होतेचशिवाय वेळेवर उपचारांमुळे गंभीर आजार टाळले जातात, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज गहलोत यांनी सांगितले.

अशी आहे दोन वर्षातील तालुकानिहाय आकडेवारी

या उपक्रमा अंतर्गत डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२६ या कावाधीत जिल्ह्यात १२,७४७आरोग्य शिबिरे घेण्यात आली. यात काटोल (१०८२), कामठी (१०६८), रामटेक (१०६१), हिंगणा (१०२०), पारशिवनी (१०१९), नरखेड (१००५), भिवापूर (१००३), सावनेर (९७६), मौदा (९६१), नागपूर ग्रामीण (९५३), कुही (९४७), कळमेश्वर (८८२) यांचा समावेश आहे. यात आतापर्यंत १२ लाख १७ हजार ०६२ रुग्णांनी लाभ घेतला असून ५ लाख ७४ हजार ७११ पुरुष तर ६ लाख ४२ हजार ३५१ महिला रुग्णांचा समावेश आहे.

Related to this topic: