Mothers-Parents Educational Melava: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आता राज्यातील शाळांमध्ये नियमितपणे ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’ आयोजित. राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापन
जुलै, ऑक्टोबर, जानेवारी, एप्रिलच्या पहिल्या शनिवारी आयोजन; मुलांच्या शिक्षणात आईची भूमिका वाढविण्यावर भर
गडचिरोली (Mothers-Parents Educational Melava) : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आता राज्यातील शाळांमध्ये नियमितपणे ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’ आयोजित केला जाणार आहे. राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार असून जुलै, ऑक्टोबर, जानेवारी आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या शनिवारी मेळावा घेण्याचे निर्देश शिक्षण आयुक्तालयाने दिले आहेत. त्यामुळे वर्षातून चार वेळा आईला थेट शाळेच्या शैक्षणिक प्रक्रियेशी जोडले जाणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० तसेच (Mothers-Parents Educational Melava) केंद्र शासनाच्या ‘निपुण भारत’ अभियानाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पालकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतः आईचा आपल्या पाल्याच्या शिक्षणातील सहभाग अधिक प्रभावी करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. माता-पालक मेळाव्यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, गुणवत्ता, उपस्थिती, अध्ययनातील अडचणी, आरोग्य व पोषण, स्वच्छता, सुरक्षितता आणि बालसंरक्षण अशा विविध विषयांवर शिक्षक आणि पालकांमध्ये संवाद साधला जाणार आहे.
विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती पालकांना देण्यासोबतच शाळेत राबविण्यात येणार्या विविध शैक्षणिक योजना, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि उपलब्ध सुविधांची माहितीही दिली जाणार आहे. माता-पालक मेळाव्यात ‘मी माझ्या मुलाच्या-मुलीच्या शिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावू शकते’ हा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात येणार आहे. यासोबतच ‘रोज २० मिनिटे मुलांसोबत’ हा उपक्रमही राबविण्यात येणार आहे.मातांनी दररोज आपल्या मुलांशी शाळेतील अध्ययन-अध्यापन, वाचन-लेखन, गोष्टींची पुस्तके, अभ्यास, आरोग्यदायी सवयी तसेच आवडते-नावडते विषय याबाबत संवाद साधावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या (Mothers-Parents Educational Melava) संवादातून मुलांच्या शैक्षणिक अडचणी वेळेत समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यास मदत होणार आहे. मातांना आपल्या पाल्याच्या शिक्षण प्रक्रियेत अधिक सक्रिय करणे, विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेणे, त्यावर योग्य उपाययोजना करणे आणि शाळेबाबत पालकांचा विश्वास वाढविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. त्याचबरोबर शिक्षक आणि पालकांमध्ये सकारात्मक, सातत्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण संवाद निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.