Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > महाराष्ट्र

आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव

आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

MLA Dr. Pragya Satav: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध विजयी झाल्यानंतर आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव यांनी गुरुवारी विधान भवन,येथील विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात


आमदार डॉ प्रज्ञाताई सातव यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ 

MLA Dr. Pragya Satav |

हिंगोली () : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध विजयी झाल्यानंतर आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव (MLA Dr. Pragya Satav) यांनी गुरुवारी विधान भवन,येथील विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲङ राहुल नार्वेकर,विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोड, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

शपथविधी दरम्यान आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव (MLA Dr. Pragya Satav) यांनी राष्ट्रमाता माँ जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,माता रमाई आणि दिवंगत खासदार राजीव सातव यांना विनम्र अभिवादन केले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या टीमचे आभार मानले.

यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव (MLA Dr. Pragya Satav) म्हणाल्या की, येणाऱ्या काळात राज्यातील शेतकरी, युवक आणि महिलांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याला माझे प्राधान्य असेल. तसेच हिंगोली जिल्ह्यातील सिंचनाचे विषय, शिक्षण विभागाच्या समस्या आणि शासकीय कार्यालयांमधील अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न सभागृहात मांडून तो मार्गी लावण्यासाठी सरकारचे लक्ष वेधून हे प्रश्न पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.