Milk Price Hike: आता पॅकेजिंग दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रूपयांनी वाढ करण्यात आल्याने खुले दूध विक्री करणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून त्यांच्याही दरात वाढ होणार
अकोला (Milk Price Hike) : मागील काही महिन्यांपासून वाढलेला उत्पादन खर्च आणि जनावरांच्या खाद्याचे वाढलेले दर यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. तसेच जनावरांचे पेंड, ढेप, सरकी, सुका व ओला चारा तसेच पशुवैद्यकीय उपचारांच्या वाढलेल्या किमतीमुळे दुग्धव्यवसाय तोट्यात चालल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात होती. मात्र आता पॅकेजिंग दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रूपयांनी वाढ करण्यात आल्याने खुले दूध विक्री करणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून त्यांच्याही दरात वाढ होणार आहे.
पॅकेजिंग गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली असून, (Milk Price Hike) दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असला तरी त्याचा परिणाम सर्वत्र होणार आहे. दुधाच्या दरात झालेली ही वाढ केवळ शहरी ग्राहकांच्या बजेटवर परिणाम करणारी नसून, यामुळे ग्रामीण अर्थकारणालाही नवी दिशा मिळणार आहे. मागील काही महिन्यांपासून वाढलेला उत्पादन खर्च आणि जनावरांच्या खाद्याचे वाढलेले दर यामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. जनावरांचे पेंड, सुका व ओला चारा तसेच पशुवैद्यकीय उपचारांच्या वाढलेल्या किंमतीमुळे दुग्धव्यवसाय तोट्यात चालल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात होती.
आता पॅकेजिंग दुधाच्या किमतीत वाढ (Milk Price Hike) झाल्याने आपसुकच गायी, म्हशीच्या खुल्या दुधाच्या दरातही वाढ होणार आहे. दुसरीकडे महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या मासिक खर्चात यामुळे आणखी भर पडणार आहे. विशेषतः चहाची दुकाने, हॉटेल व्यावसायिक आणि मिठाई विक्रेत्यांवर या दरवाढीचा थेट परिणाम दिसून येणार असून, दुग्धजन्य पदार्थांचे भाव 10 टक्क्यांनी वाढणार असल्याने सणासुदीच्या काळात गोड पदार्थांच्या खरेदीवरही याचा परिणाम होऊ शकतो.
असे राहतील नवीन दर
गाईचे दूध - प्रतिलिटर 60 रुपयांवरून 62 रुपये
म्हशीचे दूध - प्रतिलिटर 76 रुपयांवरून 78 रुपये
दुग्धजन्य पदार्थ - सर्व प्रकारच्या दुग्धजन्य पदार्थांच्या दरात 10 टक्क्यांपर्यंत वाढ